विजयानंतर चावी यादव प्रतिक्रिया देताना मुंबई : मुंबईत आज प्रतिष्टित अशी टाटा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यंदाचे मुंबई टाटा मॅरेथॉन स्पर्धेचे १८ वे वर्ष होते. पहाटेच्या सुमारास वांद्रे-वरळी सी लिंकवरुन या स्पर्धेला सुरुवात झाली. कोरोनामुळे मागची दोन वर्ष मुंबई मॅरेथॉन स्पर्धा होऊ शकली नव्हती. मुंबई टाटा मॅरेथॉन मध्ये भारतीय महिलांच्या पूर्ण मॅरेथॉन गटामध्ये सर्वांच्या अपेक्षा मागील तीन वेळा सतत विजेता राहिलेल्या सुधा सिंग हिच्यावर होत्या.
सलग चौथ्यांदा विजयी : सुधा ने सतत सन २०१८, २०१९ व २०२० या तीन वर्षी महिलांच्या गटात अव्वल क्रमांक पटकावला होता. यंदा सुधा सिंग तिचा उत्कृष्ट टायमिंग २ तास ३४ मिनिटे ५६ सेकंद हा रेकॉर्ड मोडणार की काय यावर सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना चावी यादव हिने ही स्पर्धा जिंकली. चावी यादव ने ही शर्यत जिंकण्यासाठी २ तास ५० मिनिटे ३५ सेकंद ही वेळ नोंदवली.
सुधा सिंग माझी आदर्श : विजय मिळवल्यानंतर आपल्या यशाविषयी बोलताना चावी यादव सांगते की, जेव्हा मी शर्यत सुरू केली तेव्हा मला कल्पना नव्हती की मी प्रथम येईन. परंतु पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये माझी निवड व्हायला पाहिजे हीच अपेक्षा मी माझ्या मनाशी बाळगली होती. शर्यत सुरू झाल्यावर २५ किलोमीटर पर्यंत सुधा सिंग ही सुद्धा माझ्याबरोबर धावत होती. सुधा सिंग ही माझी आदर्श आहे व माझ्यापेक्षा फार मोठा अनुभव तिच्याकडे असल्याकारणाने मी तिच्याबरोबरच धावत होती.
प्रबल इच्छाशक्तीमुळे विजयी : ती पुढे म्हणाली की, २५ किलोमीटर नंतर सुधा मागे पडली, तिच्या पायाला चमक भरली असे मला समजले व मी पुढे जात राहिली. पाहता पाहता हे अंतर वाढत गेले व ३५ किलोमीटर नंतर मला फार तणाव जाणवू लागला. परंतु प्रबल इच्छा शक्ती असल्याकारणाने मी चढ-उतार न बघता सतत धावत राहिली व ही शर्यत पूर्ण केली.
पुढील लक्ष एशियन गेम्स :चावी यादव हीने २ तास ५० मिनिटं ३५ सेकंद ही वेळ नोंदवत पहिल्या क्रमांकावर राहिली असून आरती पाटील हिने ३ तास ४४ सेकंदामध्ये ही स्पर्धा पूर्ण करत ती दुसऱ्या स्थानकावर राहिली. तर रेणु सिंग हीने ३ तास १ मिनिट ११ सेकंद इतकी वेळ देत तिसरा क्रमांक पटकावला. चावी यादव हीच पुढील लक्ष आता एशियन गेम्सची तयारी असून, एशियन गेम्स मध्ये ३ हजार मीटर ट्रिपल चेस प्रकारात ती प्रावीण्य मिळविण्याच्या प्रयत्नात असून आता ती त्या तयारीला लागणार आहे.