पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि वसतीगृह शुल्क माफ करा; छात्र भारती विद्यार्थी संघटनेची मागणी - मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांना निवेदन
ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात सांगली, कोल्हापूर, गडचिरोलीसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामध्ये अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि वसतीगृह शुल्क सरसकट माफ करण्याची मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या देण्यात आसले आहे.
![पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि वसतीगृह शुल्क माफ करा; छात्र भारती विद्यार्थी संघटनेची मागणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4984252-596-4984252-1573073267091.jpg)
मुंबई-राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. खरिपाची पिके सडून गेली आहेत. दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. या दुष्काळग्रस्त भागातून आलेले अनेक विद्यार्थी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि वसतीगृह शुल्क माफ करावे, या मागणीचे निवेदन छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने कुलगुरुंना देण्यात आले आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात सांगली, कोल्हापूर, गडचिरोलीसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामध्ये अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि वसतीगृह शुल्क सरसकट माफ करण्याची मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या देण्यात आसले आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती असणाऱ्या महामहीम राज्यपाल यांनाही छात्र भारतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कुलगुरुंनी यावेळी सात दिवसांत या प्रश्नावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना दिले. जर सात दिवसांत विद्यापीठ प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही तर छात्र भारती तीव्र आंदोलन करेल, असा इशारा छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले यांनी दिला आहे.