मुंबई -पर्यावरणाच्या रक्षणासाठी आज अनेक प्रकारचे प्रकल्प सुचवले जातात. वृक्षांची लागवड व जोपासना करणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. मुंबईतील काही सामाजिक संस्थांनी देखील झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विक्रोळी येथील चार्ली स्पोर्ट क्लबतर्फे 5 हजार पिंपळाच्या झाडांचे वाटप करण्यात येणार आहे.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी, चार्ली स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष आणि सदस्य हेही वाचा -राज्याचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर, 3 महिन्यानंतर पहिल्यांदाच आढळले सर्वात कमी रुग्ण
दरवर्षी वृक्षांची लागवड करण्यात येते
जागतिक पर्यावरण दिनी मुंबई आणि राज्यात अनेक उपक्रम साजरा केले जातात. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विक्रोळीतील चार्ली ग्रुपने ५ हजार पिंपळाची झाडे लावण्याचा मानस केला आहे. पिंपळाच्या झाडांचे खूप फायदे आहेत, यामुळे या झाडांचा फायदा मुंबईकरांना होणार आहे. दरवर्षी या ग्रुपतर्फे मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात येते. यावर्षीदेखील जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळावा या हेतूने पिंपळाच्या झाडाची निवड या ग्रुपने केली आहे. पिंपळाबरोबर जांभूळ आणि आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
चार्ली स्पोर्ट क्लबतर्फे 5 हजार पिंपळाच्या झाडांचे होणार वाटप पिंपळाच्या झाडाचे फायदे
पिंपळाच्या दोन पानांचे सेवन केल्यास ऑक्सिजनची पातळी वाढू शकते. यासाठी आपल्याला दररोज पिंपळाच्या दोन पानांचे चावून सेवन करावे लागेल. पिंपळामध्ये मॉइश्चर सामग्री, कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी, फायबर, कॅल्शियम, लोह, तांबे आणि मॅग्नेशियमचे घटक असतात.
चार्ली स्पोर्ट क्लबतर्फे 5 हजार पिंपळाच्या झाडांचे होणार वाटप हेही वाचा -BreakTheChain : राज्यात सरसकट शिथिलता नाही; स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्बंधांबाबत ठरवेल