मुंबई : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात दोषी म्हणून आरोपी असलेल्या शीजान खानविरुद्ध पोलिसांनी वसई न्यायालयात चार्जशिट दाखल केली आहे. तसेच, त्याच्या जामीन अर्जावरदेखील हायकोर्टाकडून उद्या सुनावणी होणार आहे. तुनिषाचा माजी प्रियकर असलेला शीझान खान, जो सध्या पोलिस कोठडीत आहे. याने पोलिसांना सांगितले की, 'श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येनंतर निर्माण झालेल्या देशातील वातावरणामुळे तो व्यथित झाला होता' म्हणून त्याने नाते संपवण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये त्याचे असे म्हणणे होते की, त्याने तिला सांगितले होते की, आमच्या समाजाचे लोक तसेच आपल्या वयातील अंतर आपल्या प्रेमात अडसर असणार आहे.
आत्महत्येचा प्रयत्न :24 डिसेंबर रोजी एका टीव्ही शूटच्या सेटवर वॉशरुममध्ये मृतावस्थेत सापडल्याच्या पंधरवड्यापूर्वी तुनिशा आणि शीझानचे ब्रेकअप झाले होते. चौकशीत शीझानने पुढे सांगितले की, तुनिषाने याआधीही ब्रेकअप झाल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी मी तिला वाचवले. तुनिषाच्या आईला तिची विशेष काळजी घेण्यास सांगितले.
लग्नाची खोटी आशा :दरम्यान, तुनिषाची आई वनिता हिने आरोप केला आहे की, शीझानने तुनिषाला लग्नाची खोटी आशा दाखवून फसवणूक केली आहे. शीझान तुनिशासोबत रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवला होता. त्याने तीन ते चार महिने तिचा वापर केला आणि नंतर तिच्याशी संबंध तोडले,असे तिने सोमवारी प्रसिद्ध झालेल्या माध्यमांना उद्देशून केलेल्या व्हिडिओमध्ये आरोप केले.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा :वनिताने पुढे शीझानवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याला सोडता कामा नये. मी माझे मूल गमावले आहे, असे अस्वस्थ झालेल्या आईने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तिचा सहकलाकार आणि माजी प्रियकर शीझान खान याने आत्महत्येला तिला प्रवृत्त केले असल्याचा दावा करीत तुनिषाच्या मृत्यूनंतर आईने वालीव पोलीसात तक्रार दाखल केली होती.
गुन्हा दाखल नंतर चौकशीत या बाबी समोर :वनिताच्या तक्रारीनंतर खानविरुद्ध भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी वालीव पोलिसांनी 'अली बाबा : दास्तान ए काबुल' या स्टारला अटक केली. वसई न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी सांगितले की, शीझान आणि तुनिशा नेहमीप्रमाणे सेटवर एकत्र जेवणासाठी जाण्यापूर्वी मेकअप रूममध्ये भेटले होते. पण तुनिशाने त्यादिवशी जेवण केले नाही. दुपारच्या जेवणानंतर, शीझान कामात व्यस्त झाला तर तुनिशा वॉशरूममध्ये गेली आणि बराच वेळ परत न आल्याने संशय निर्माण झाला. काही वेळातच ती मृतावस्थेत आढळली.
ब्रेकअप : दरम्यान, पोलिसांनी ट्युनिशाच्या गर्भधारणेचा किंवा या घटनेला 'लव्ह जिहाद'चा कोणताही कोन असण्याचा अंदाज फेटाळून लावला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण 'फाशी' असल्याची पुष्टी झाली. पोलिसांनी असेही सांगितले की तुनिषा शर्मा तणावाखाली होती आणि खानसोबतचे ब्रेकअप झाल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असा संशय आहे.
हेही वाचा : ST Employee Salary Issue : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी हवेत 350 कोटी, पण राज्य शासन...