महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल

या आरोपपत्रात नायर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे जबाब , पायल तडवीच्या कुटुंबीयांचे जबाब यांच्यासह इतर पुरावे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहेत.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल

By

Published : Jul 23, 2019, 8:05 PM IST

मुंबई- डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने 25 जुलैपर्यंत तहकूब केली आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने आरोपींविरोधात सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी डॉक्टर हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी 1 हजार 800 पानांचे आरोपपत्र न्यायालयात मंगळवारी दाखल केले. डॉ. पायल तडवी प्रकरणात रॅगिंग व अट्रोसिटीचा गुन्हा आगरीपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. त्यानंतर याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. तपास पूर्ण करून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

या आरोपपत्रात नायर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे जबाब , पायल तडवीच्या कुटुंबीयांचे जबाब यांच्यासह इतर पुरावे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहेत. पायल तडवी प्रकरणात सत्र न्यायालयाकडून जामीन फेटाळल्यानंतर तीनही महिला डॉक्टर आरोपीनी उच्च न्यायालयात मंगळवारी याचिका दाखल केली होती. त्यावर 25 जुलै पर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details