मुंबई:शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तसेच त्यांचा भाऊ प्रविण राऊत यांच्यासह इतर आरोपींविरोधात पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या घोटाळ्यात संजय राऊत यांचे नाव आल्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांना काही महिने जेल मधे जावे लागले. या खटल्याची सुनावणी अंतीम टप्यात आली असुन आरोप निश्चिती लवकरच होणार आहे मात्र सगळे आरोपी एकत्र उपस्थित राहत नसल्यामुळे आरोप निश्चिती वारंवार रखडत आहे.
मुंबईमधील पत्राचाळ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले. आणि त्यात उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांसह इतर अनेक आरोपींवर खटला दाखल आहे. आजच्या सुनावणीच्या वेळी आरोपी संजय राऊत, प्रवीण राऊत कोर्टात हजर झाले होते. सुनावणीवेळी गुरूआशिष कंपनी या आरोपी बनवण्यात आलेल्या आरोपीच्यावतीने कोण जबाबदारी घेणार? याचे उत्तर अनुत्तरीत राहिले. कारण सर्व आरोपी या वेळेला हजर नव्हतेच.
गुरूआशिष कंस्ट्रक्शन कंपनी पत्राचाळ घोटाळ्यात आरोपी आहे मात्र आजच्या सुनावणीच्या वेळीही त्यांचे कोणीही हजर नव्हते. ईडीनं बनवलेल्या आरोपी क्रमांक 4 वरील कंपनीचे प्रकरण लवादापुढेही प्रलंबित आहे. पत्राच्या घोटाळा प्रकरणी आरोपी वारंवार गैरहजर मुळे आज देखील आरोप निश्चिती अखेर झाली नाही. गुरूआशिष कंस्ट्रक्शनसाठी पत्राचाळ घोटाळ्याचा खटला थांबवून ठेवायचा का?असा प्रश्व न्यायालयाने उपस्थित केला आहे.