मुंबईChar Dham Yatra Fraud:33 प्रवाशांच्या समुहाला चार धाम यात्रेला कमी पैशात जाण्याचे आमिष दाखवून ट्रॅव्हल एजंटनी लाखो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी 53 वर्षीय व्यक्तीला मुंबईतील कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच व्यक्तीसह त्याच्या एका साथीदाराने बोरिवलीतही यात्रेच्या नावाखाली काही जणांची फसवणूक केली. याप्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पैसे घेतले आणि झाला फरार:गेल्या वर्षी 2022 मध्ये अटक करण्यात आलेल्या राजेश पटेल (53) याने कांदिवली पश्चिम येथे टूर अँड ट्रॅव्हल्सचे कार्यालय उघडले होते. त्याने बर्याच वृत्तपत्रांमध्ये स्वस्त दरात चारधाम ट्रॅव्हल पॅकेजची जाहिरात केली होती. ज्यात बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथधाम आणि रामेश्वरमचा समावेश होता. वाचल्यानंतर एक महिला शिक्षिका पटेल यांच्याकडे आली. तिथे पटेल यांनी 30 प्रवाशांचे पॅकेज 10 लाख 85 हजार रुपये ठरवले. महिला शिक्षिकेने प्रति प्रवासी 11 हजार रुपये घेतले आणि 22 मार्च 2022 रोजी अॅडव्हान्स म्हणून 30 हजार रुपये राजेश पटेल यांच्या कार्यालयात जमा केले. ती 17 एप्रिल 2022 रोजी पटेल यांच्या कार्यालयात गेली तेव्हा तेथील कार्यालय बंद होते. तिने पटेल यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला; परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
गुप्त माहितीच्या आधारे ट्रॅव्हल एजंटला अटक :या महिला शिक्षिकेने कांदिवली पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांनी गुन्हा दाखल करून राजेश पटेलचा शोध सुरू केला. मात्र तो कुठेच सापडला नाही. 2 नोव्हेंबर 2023 रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे कांदिवली पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला बोरिवली येथे हजर करण्यात आले. कोर्टात न्यायाधीशांनी त्याला पोलिस कोठडी सुनावली.