मुंबई -माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या निधनाने एक विद्वान, कर्तबगार आणि राष्ट्रीय विचारांसाठी समर्पित नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याने पक्षामध्ये निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जेटलींना आदरांजली वाहिली.
अरुण जेटलींच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली - चंद्रकांत पाटील - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या निधनाने एक विद्वान, कर्तबगार आणि राष्ट्रीय विचारांसाठी समर्पित नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याने पक्षामध्ये निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.,असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जेटलींना आदरांजली वाहिली.
भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटलींचे काल (शनिवारी) दिल्लीच्या एम्स रुग्मालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना राजकीय वर्तुळातून येत आहे.
भाजपचे प्रचंड कर्तृत्वान असलेले नेते एकामागोमाग एक निघून जात आहेत. मागील काही दिवसात मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज आणि आता अरुण जेटलींचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले असल्याचे पाटील म्हणाले. देशातील व्यवस्था मजबुत होण्यासाठी जेटलींची खूप मोठी मदत झाली. विद्वत्तेबरोबर त्यांच्याकडे नम्रताही होती. तसेच वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना एकत्र घेऊन जाण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते.