महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पनवेल दौऱ्यावेळी शेकाप, महाविकास आघडीचं आंदोलन...खड्ड्यांना घातले फुलांचे हार - आमदार महेश बालदी

Chandrashekhar Bawankule : महाविजय २०२४ च्या (Maha Vijaya 2024) अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पनवेलमध्ये संघटनात्मक (Bawankule Panvel Visit) दौरा होता. यावेळी शेकाप, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रत्यावर उतरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलं.

Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पनवेल दौऱ्या दरम्यान आंदोलन

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 8:57 PM IST

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पनवेल दौऱ्यावेळी आंदोलन

नवी मुंबई Chandrashekhar Bawankule : महाविजय २०२४ च्या (Maha Vijaya 2024) अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पनवेल दौऱ्यावर (Bawankule Panvel Visit) होते. त्यांच्या स्वागतासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, (Prashant Thakur) तसंच उरणचे आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) यांच्यासह शेकडो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले होते. याचवेळी शेकाप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रत्यावर उतरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलं. कारण बावनकुळे पनवेलला येणार म्हणून पनवेल शहरातील रस्त्याची डागडुजी करून शहर खड्डेमुक्त करण्यात आलं होतं. यावेळी हातात कालचे रस्ते आणि आजचे रस्ते यांचा फोटो दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. (Maha Vikas Aghadi On Roads)




प्रशासकीय राजवट की भाजपची पगारी राजवट ? : पनवेल शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. इतका वेळ नागरिकांनी तक्रार दाखल करूनही पनवेल महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून खड्डे बुजवल्याची तसदी घेतली नाही, मात्र बावनकुळे यांचा पनवेल मध्ये दौरा होणार हे पाहताच सत्ताधारी पक्ष्यांच्या माध्यमातून सर्व खड्डे बुजवले गेले. पनवेल महापालिकेचे प्रशासन (Panvel Mahanagarpalika) रात्रभर रस्त्यावर उतरून काम करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या विरोधात पनवेल मधील शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पनवेल प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. प्रशासकीय राजवट की भाजपाची पगारी राजवट? असा आरोप शेकाप नेते गणेश कडू यांनी केला आहे.




रस्त्यावरील खड्ड्यांना हार घालत व्यक्त केला संताप : कळंबोली मधील रस्त्यांवर पडलेले खड्डे यामुळे प्रवाशांचे कंबरडे मोडत आहे. पनवेल पालिका फक्त आश्वासने देत असून रस्त्यांवरील पडलेले खड्डे ही समस्या गेल्या पाच वर्षांपासून आहे. बावनकुळे पनवेलमध्ये येणार म्हणून एका रात्रीत पनवेलचे रस्ते दुरुस्त होतात. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये येणार आहेत तर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र कळंबोली सारख्या ठिकाणी रस्त्यांवरील समस्या वर्षानुवर्षे तशीच आहे. एकदा मोदींनी खारघरला आल्यावर कळंबोलीमध्ये देखील यावे जेणेकरून सर्वसामान्य माणसांच्या समस्या आणि होत असलेले हाल समजतील अशी भावना, शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांवर फुलांचे हार घालत पनवेल पालिकेच्या कामावर संताप व्यक्त करण्यात आला.



हेही वाचा -

  1. Oppose To Bawankule Visit : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला पक्षातील अंतर्गत वादाचे 'ग्रहण'
  2. Chandrashekhar Bawankule On Congress : 'काॅंग्रेसच्या रक्तात कन्फ्यूज करण्याचं राजकारण', चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
  3. Bawankule On Nana Patole : पंतप्रधानांनी देशासाठी काय केलं; नाना पटोलेंनी माझ्यासोबत करावी खुली चर्चा, बावनकुळेंचं आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details