महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chandrashekar Bawankule : पुढील निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडे उमेदवार राहणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे - अजित पवार

Chandrashekar Bawankule : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लक्षात येतात सर्वच राजकीय पक्षांनी जोरात तयारी करायला सुरुवात केली आहे. अशात केंद्रातील योजना सुद्धा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. याच अनुषंगाने मुंबई भाजपा कार्यालयात आज आता जाहीर झालेल्या विश्वकर्मा योजने संदर्भात आढावा घेण्यात आला. प्रसंगी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी व त्यांच्या नेत्यावर सडकून (Chandrashekar Bawankule On Mahavikas Aghadi) टीका केली आहे.

Chandrashekar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 10:57 PM IST

माहिती देताना मार्गदर्शी चिट फंडचे संचालक पी लक्ष्मण राव

मुंबईChandrashekar Bawankule : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने घोषित केलेल्या विश्वकर्मा योजना (Vishwakarma Yojana) संदर्भात व ती अंमलात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये राज्यात ३ लाख लोकांना याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी पूर्ण तयारी झाली असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. या योजनेद्वारे एका व्यक्तीला लाभ भेटला तर त्याच्या मागे १० लोकांना त्याचा लाभ भेटणार आहे. अशा प्रकारे सुरुवातीला ३० लाख लोकांना याचा लाभ भेटणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या योजनेचा दुसरा टप्पा सुद्धा लवकरच अंमलात येणार आहे. या कारणाने १८ पगड जातींना याचा सर्वतोपरी लाभ भेटणार असल्याचेही त्यांनी (Chandrashekar Bawankule On Mahavikas Aghadi) सांगितलं आहे.



महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे : मराठा आरक्षणावरून सध्या मराठा नेते जरांगे पाटील (Jarange Patil) फार आक्रमक झाले आहेत. त्यांनी आरपारची भूमिका घेतली आहे. याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण भेटलेच पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस,(Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) असतील यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा एक मुखानं मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी समर्थन दिलं आहे. परंतु हे आरक्षण देत असताना इतर समाजावर अन्याय होता कामा नये हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. या प्रश्नावर सामाजिक दृष्ट्या पहिले गेले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं. यासाठी त्यांनी या पूर्ण विषयाचा गाढा अभ्यास केला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, असा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.



आमच्याकडे पक्षप्रवेशाच्या याद्या तयार :शरद पवारांची साथ सोडून गेलेले नेते परत येतील असं विरोधी पक्ष नेते तसेच काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार बोलले आहेत. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल यांच्यासोबत राहिलेले नेते हे निवडणुकीपर्यंत त्यांच्यासोबत राहतील की नाही ही सुद्धा शंका आहे. कारण काँग्रेस पक्षामधून प्रवेश करण्यासाठी आमच्याकडे इच्छुक नेत्यांची यादी तयार झाली आहे. तशाच पद्धतीची यादी इतर पक्षाकडून शिंदे गटात व अजित पवार यांच्या गटात येण्यासाठी तयार झाली असून लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार, उद्धव ठाकरे त्याचबरोबर काँग्रेसकडे उमेदवार ही भेटणार नाही.



केंद्रात मंत्रीपदी नाना पटोले यांचा नंबर :काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, नाना पटोले व विजय वड्डेटीवार यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. नाना पटोले भाजपा सोडून ज्या पक्षात गेले त्या कारणाने त्यांना आता त्रास होत आहे. राज्यात १५ च्या वर मंत्री ओबीसी समाजाचे आहेत. देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली. याचं दुःख नाना पटोले यांना होत आहे. नाना पटोले काँग्रेसमध्ये गेले परंतु त्यांना मंत्रीपद भेटले नाही. नाना पाटोले जर आता भाजपमध्ये असते व त्यांनी भाजपची साथ सोडली नसती तर केंद्रामध्ये जे २७ ओबीसी मंत्री आहेत. त्यामध्ये नाना पटोले यांचाही नंबर लागला असता.

ABOUT THE AUTHOR

...view details