महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वयानुसार शिवराज पाटील यांची बुद्धी भ्रष्ट झाली; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Chandrasekhar Bawankule Criticism: श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते शिवराज पाटील Senior Congress leader Shivraj Patil यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून शिवराज पाटील यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, असा टोला लगावत सुरज पाटील यांनी देशाची माफी मागावी, असेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे BJP state president Chandrasekhar Bawankule यांनी म्हटले आहे.

Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar Bawankule

By

Published : Oct 21, 2022, 4:25 PM IST

मुंबई:श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते शिवराज पाटील Senior Congress leader Shivraj Patil यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून शिवराज पाटील यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, असा टोला लगावत सुरज पाटील यांनी देशाची माफी मागावी, असेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे BJP state president Chandrasekhar Bawankule यांनी म्हटले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवराज पाटील यांनी देशाची माफी मागावी या मुद्द्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मतांच्या तुष्टीकरणासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. उद्या जर महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडली तर यासाठी तेच जबाबदार असतील. त्यांना विनंती आहे, की त्यांनी अशी भडकाऊ वक्तव्य करू नये. शिवराज चाकूरकर यांनी देशाची माफी मागावी. चाकूरकर यांच्याबद्दल आदर होता, पण आता तो आदर वाटत नाही. अर्जुनाच्या उपदेशावर जिहाद सारखा उल्लेख करणे हा महाराष्ट्र् आणि देशाचा आणि हिंदू धर्माचा अपमान आहे. वयानुसार त्यांची बुद्धी देखील भ्रष्ट झाली आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे.

मनसे दीपोत्सवाचा कोणी राजकीय अर्थ काढू नये ? राज्यात शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्व आल्यानंतर मनसेबरोबर भाजप व शिंदे यांची जवळीक वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर आज मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा हजेरी लावणार आहेत. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व दिलदार आहे. त्यांना टीका करायची असेल किंवा मैत्री करायची असेल तर ते खुल्या मनाने करतात. त्यांच्या मैत्रीत राजकारणाचा लवलेशही नसतो, म्हणून आजच्या दीपोत्सवाचा कोणी राजकीय अर्थ काढू नये, असेही बावनकुळे यांनी सांगितले आहे.

सीबीआयला खुली सूट दिली त्याचे स्वागत ! २१ ऑक्टोबर २०२० ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीबीआयकडून राज्यात चौकशीची परवानगी काढून घेण्यात आली होती. तेव्हापासून राज्यात सीबीआय चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. मात्र आता शिंदे सरकारने सीबीआयला पुन्हा चौकशीची परवानगी दिल्याने सीबीआयचा परवानगी शिवाय तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, सीबीआयची मविआ ला भीती का वाटते ? कारण सीबीआय तुम्हाला उचलू शकेल, कारवाई करू शकेल म्हणून तुम्ही बंदी घातली. सरकारच्या या निर्णयाचं स्वागतचं केलं पाहिजे. आता सरकारने सीबीआयला खुली सुट दिली आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details