महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाबरण्याची गरज नाही; प्रवाशांच्या सुटकेसाठी प्रशासन प्रयत्नरत - चंद्रकांत पाटील - महालक्ष्मी एक्सप्रेस

बोटी घेऊन एनडीआरएफची चाळीस जणांची टीम आणि २ हॅलीकॉप्टर घटनास्थळी दाखल झालेले आहेत. यांच्या माध्यमातून बचाव कार्य सूरु असून महालक्ष्मी एक्सप्रेस मधील सर्व प्रवाशांना सुरक्षितरितीने आधी बदलापूरला आणि नंतर विशेष रेल्वेने कोल्हापूरला पोहचवण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे - चंद्रकांत पाटील

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

By

Published : Jul 27, 2019, 3:26 PM IST

मुंबई - मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर स्थानकाच्या पुढे उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यात अडकली होती. या रेल्वेत तब्बल ७०० प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान तब्बल १२ तासानंतर या प्रवशांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले. याबाबत माहिती देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही प्रवाशाने अथवा त्यांच्या नातेवाईकांनी घाबरण्याची गरज नाही, सर्वांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रीया

पाटील म्हणाले, उल्हास नदीला मोठा पूर आला आहे. रेल्वे रुळांवर सर्वत्र पाणी साचलेले आहे, त्यामुळे लोको पायलट गाडी पुढे चालवण्याचे धाडस करु शकत नाहीत. यामुळे रात्री २ वाजल्यापासून महालक्ष्मी एक्सप्रेस रुळावरच थांबविण्यात आली होती. त्यामध्ये अनेक प्रवासी अडकले होते. त्यात पाण्याची पातळी थोडी वाढत असल्याने खुप चिंता आहे. पण मी कोल्हापूर जिल्हातील सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की, बोटी घेऊन एनडीआरएफची चाळीस जणांची टीम आणि २ हेलीकॉप्टर घटनास्थळी दाखल झालेले आहेत.

बचाव पथकाच्या माध्यमातून मदत कार्य सुरू असून महालक्ष्मी एक्सप्रेस मधील सर्व प्रवाशांना सुरक्षितरितीने आधी बदलापूरला आणि नंतर विशेष रेल्वेने कोल्हापूरला पोहचवण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नसून प्रशासन सगळे प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रीया महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details