मुंबई :राज्यातील उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या प्राध्यापकांच्या तासिकामध्ये दरबार करण्यासंदर्भात प्रस्ताव वित्त विभागाकडे प्रलंबित होता. या प्रस्तावाला वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार यापुढे प्राध्यापकांच्या तासिका दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना प्राध्यापकांना सरकारने भेट दिली आहे.
तासिका दरात किती झाली वाढ? : कला वाणिज्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी 625 रुपयांवरून 900 रुपये इतकी तासिका वाढ, पदवीधर अभ्यासक्रमासाठी साडेसातशे वरून हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. पदवी आणि पदवीधर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 750 वरून हजार रुपये, तर तंत्रशिक्षणाच्या संदर्भात अभियांत्रिकी शिक्षणासाठी तज्ञ अभियंते अथवा ज्येष्ठ अभ्यासक यांच्या व्याख्यानासाठी नव्याने सुरुवात करण्यात येत आहे. हजारहून दीड हजार तर पदवी पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी 600 हून 900 रुपये, कला पदवी पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी 625 होऊन 900 रुपये मानधन करण्यात येत असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.