मुंबई -इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा निधी वाडिया रुग्णालयाला द्यावा, असे प्रकाश आंबेडकरांनी विधान केले होते. ते विधान आंबेडकरी समाजाची भावना दुखवणारे असल्याची टीका काँग्रेसचे माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी आज चेंबूर येथे पत्रकार परिषदेत केली.
हेही वाचा-शिर्डी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, दुपारी २ वाजता बैठक
मुंबईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे ही अनेक दिवसांपासून आंबेडकरी जनतेची मागणी होती. याकरता बरेच आंदोलन करण्यात आले होते. केंद्रातील मागील काँग्रेस व भाजप सरकारने स्मारकच्या सर्व पूर्तता केल्या असून काही कामाला सुरुवातही झाली आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदूमिलला भेट देऊन स्मारकाचे काम दोन वर्षात पूर्ण करावे व नियोजित पुतळ्याच्या उंचीतही वाढ करावी, असे आदेश दिले आहेत.
स्मारकाला विरोध करणारी कोणीतीही एक व्यक्ती म्हणजे आंबेडकरी समाज नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत इंदूमिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य पुतळ्यासहीत भव्य स्मारक लवकरात-लवकर झालेच पाहिजे यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही हंडोरे यावेळी म्हणाले.