Anil Deshmukh fined: वकिल गैरहजर, चांदीवाल आयोगाचा अनिल देशमुखांना 50 हजाराचा दंड
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Suspended police officer Sachin Waze) यांची उलट तपासणी करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांचे वकील चांदिवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) गैरहजर राहिले. त्यामुळे आयोगाने देशमुखांना पुन्हा ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे हा दंड मुख्यमंत्री सहायत्ता निधीमध्ये (CM fund) जमा करण्याचे आदेशही दिले आहेत.
मुंबई: दर महिन्याला 100 कोटी रूपयांच्या वसुलीचे टार्गेट पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याच्या कथीत आरोपावर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सध्या चांदिवाल आयोगात चोकशी सुरू आहे. मुंबई पोलीस दलातून बडतर्फ झालेले अधिकारी सचिन वाझेंना एनआयएने अटक केलेली आहे ते सध्या मुंबई पोलीसांच्या ताब्यात आहेत. देशमुख आणि वाझे यांची सध्या आयोगात समोरा समोर चौकशी सुरू आहे. आत्ता पर्यंत दोन वेळा देशमुखांच्या वकिलांनी उलट तपासणी घेतली आहे. देशमुखांचे वकिल पुन्हा वाझेंची उलट तपासणी घेणार होते. मात्र, देशमुखांचे वकील आयोगासमोर हजर झाले नाही. त्यामुळे पुढील सुनावणी 22 डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. दरम्यान वकील गैर हजर राहिल्या मुळे आयोगाने देशमुखांना 50 हजाराचा दंड ठोठावला आहे. ह दंड मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या पूर्वी पण आयोगाने देशमुखांना 15 हजार रूपयांचा दंड ठोठावला होता.