मुंबई:'आयसीआयसीआय' बँकेच्या तत्कालीन संचालिका चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांनी बेकादेशीररित्या व्हिडिओकॉन कंपनीचे मालक म्हणजे वेणुगोपाल धूत यांच्या कंपनीला कर्ज दिले होते, असा आरोप आहे. त्या संदर्भात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने या संदर्भात खटला दाखल केला आहे. व्हिडिओकॉन यांच्यावर 3250 कोटी रुपये संदर्भातील घोटाळा केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात उच्च न्यायालय तसेच सीबीआय न्यायालय या दोन्ही ठिकाणी खटला सुरू आहे.
असा झाला गैरवापर:"जनतेची जमापुंजी बँकेमध्ये होती आणि 'आयसीआयसीआय' बँकेच्या संचालिका असताना पदाचा गैरवापर चंदा कोचर यांनी केला. दरम्यान त्यांनी व्हिडिओकॉनच्या सर्व कंपन्यांना बेकादेशीर कर्ज देण्यासाठी आपल्या पदाचा वापर केला. हे कटकारस्थान करून केलेले आहे, असा आरोप सीबीआयचे वकील एलिमोसिन यांनी आज न्यायालयासमोर केला.
19 कोटीच्या फ्लॅटची खरेदी :चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर केला म्हणूनच त्यांच्या मुलाने 2021 नोव्हेंबर महिन्यामध्ये 'सीसीआय चेंबर्स'मध्ये 19 कोटी 11 लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. तसेच 2016 या कालावधीमध्ये व्हिडिओकॉन कंपनीच्या समूहाला तेव्हा 5.3 कोटी रुपये त्या वेळेला त्यांना देण्यात आले होते. हे कर्ज बेकायदेशीररित्या 'आयसीआयसीआय' बँकेच्या संचालिका चंदा कोचर यांच्या काळात दिले गेले होते.
3 जुलैला सुनावणी :'सीबीआय'च्या वतीने अजून दावा करण्यात आला की, जेव्हा चंदा कोचर या संचालिका होत्या त्यावेळेला व्हिडिओकॉन इंटरनॅशनल या कंपनीला त्यांनी 2009 मध्ये कर्ज मंजूर केले होते. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर यासंदर्भात न्यायालयाने 3 जुलै रोजी यासंदर्भात पुढील सुनावणी निश्चित केलेली आहे.
कोचर दाम्पत्याला मिळाला होता जामीन : आयसीआयसीआय बँक कथित कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने चंदा कोचर व त्यांचे पती दीपक यांना अटक केली होती. सीबीआयच्या कारवाई विरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 9 जानेवारी, 2023 रोजी उच्च न्यायालयाने जामिन दिला होता.
कारवाईचे समर्थन: कोटय़वधी रुपयांच्या कथित कर्ज गैरव्यवहार प्रकरणात चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने 24 डिसेंबरला अटक केली. सीबीआयने केलेली ही कारवाई बेकायदा असल्याचा दावा करीत कोचर दांपत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी मागील सुनावणी वेळी न्यायालयाने सीबीआयला उत्तर सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सुनावणी वेळी सीबीआयने आपल्या कारवाईचे समर्थन केले. तथापि कोचर दाम्पत्याला कायद्याचे उल्लंघन करीत अटक केली गेल्याचा दावा अॅड. विक्रम चौधरी आणि अॅड. अमित देसाई यांनी केला. याच वेळी मुलाच्या लग्नासाठी अंतरिम दिलासा देत तातडीने कारागृहातून सुटका करण्याची विनंती कोचर दांपत्यातर्फे करण्यात आली. सर्व युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने निकाल राखून ठेवला.