मुंबई -वातावरणातील चढ उतारामुळे सध्या मुंबईकरांना थंडीत पावसाळ्याचा अनुभव येत आहे. मुंबई शहरातील काही भागात आज ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अरबी समुद्राचा वायव्य भाग ते उत्तर पंजाब या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, तर गुजरात व राजस्थानच्या नैॠत्य भागात आणि सौराष्ट्र या भागात चक्रिवादळासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ५ ते १२ जानेवारीदरम्यान उत्तर महाराष्ट्र तसेच विविध भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तापमानाचा पारा वाढूनही हवेत अधिक गारवा निर्माण झाला आहे. पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र तसेच विविध भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व दाट धुके पडले आहे. अनेक ठिकाणी दवबिंदू दिसून येत आहेत. यामागे अफगाणिस्तानकडून येणारे पश्चिमी वारे म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हे वैज्ञानिक कारण आहे. ५ ते १२ जानेवारीदरम्यान पाऊस पडू शकतो, असे कुलाबा हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पुढील हवामानाचा अंदाज -