महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांकडून कागदपत्रे मागवली, आता लक्ष उद्याच्या सुनावणीकडे

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या रिट याचिकेवर आज सुनावणी झाली मात्र, न्यायालयाने कोणताही निर्णय न देता, सत्तास्थापन करताना राज्यपालांनी पाहिलेली कागदपत्रे उद्या १०.३० वाजेपर्यंत न्यायालयात हजर करण्यास सांगितले असून पुढील सुनावणी उद्या (सोमवारी) होणार आहे.

आज सुनावणी

By

Published : Nov 24, 2019, 8:14 AM IST

Updated : Nov 24, 2019, 2:59 PM IST

लाईव्ह अपडेट्स -

* हॉटेलमध्ये थांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघाले. आदित्य ठाकरेही सोबत

* राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे मुंबईत राष्ट्रवादीचे इतर आमदार राहत असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. कोकाटे हे शपथविधीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत होते, कालपासून राष्ट्रवादीच्या ते संपर्कात नव्हते. हॉटेलमध्ये शरद पवारही उपस्थित आहेत.

* सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, न्यायालयाच्या निर्णयामुळे ते तोंडावर पडले आहेत - आशिष शेलार

सर्वोच्च न्यायालयातील घडामोडी

  • उद्या १०.३० वाजेपर्यंत या निर्णयावरील राज्यपालांनी कागदपत्रे सादर करावीत. त्यानंतर सर्वोच्च निर्णय उद्या पुन्हा सुनावणी घेईल - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
  • जवळपास १ तास सुनावणी सुरू
  • राज्यपालांचा निर्णय चुकीचा असल्यास न्यायालयाने त्यांना रितसर नोटीस बजावावी, त्यांना सत्तास्थापने वेळी कोणती कागदपत्रे दिली नव्हती ती आम्ही सादर करू शकतो.
  • राज्यपालांनी विधानसभेच्या अधिवेशनाची दिलेली तारीख न्यायालय बदलू शकणार नाही - रोहतगी
  • राज्यपालांना हक्क असले तरी ते कोणालाही उठून शपथविधीसाठी बोलावू शकत नाहीत - न्यायाधीश रमण्णा
  • बहुमत होते तर आघाडीने सरकार का नाही स्थापन केले. राज्यपालांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देता येत नाही. बहुमत सिद्ध करण्याची मागणी करता येऊ शकते - रोहतगी
  • मुख्यमंत्र्यांना नोटीस दिली गेलेली नाही. त्यांची बाजू ऐकल्याशिवाय न्यायालयाने निर्णय देऊ नये - मुकुल रोहतगी (भाजप वकील)
  • ज्यांनी इतक्या लवकर सत्ता स्थापन करण्याचा दावा केला, ते बहुमत करण्यापासून इतक्या दूर का पळतायत - सिंघवी
  • कर्नाटकात इतका वेळ बहुमत सिद्ध करण्यासाठी दिला गेला नव्हता, त्यावेळी न्यायालयाने लगेचच बहुमताची चाचणी घेण्यास सांगितले होते. तसेच आणि त्यावेळीप्रमाणे गुप्त मतदान होणार नाही, मतदानाचे थेट प्रेक्षपण करण्यात यावे. वारंवार कर्नाटकमधील सत्तास्थापनेवेळच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा हवाला दिला जात आहे.
  • राष्ट्रवादीच्या आमदारांचे पत्र न्यायालयात सादर, ४१ आमदारांच्या सह्या या पत्रावर आहेत. अजित पवारांना त्यांचा पाठींबा नाही.
  • जेव्हा एखादी आघाडी पत्रकार परिषद घेऊन बहुमत असल्याचे सांगत असताना, त्यांच्या विरोधी पक्षाकडच्या संख्याबळाची खात्री नसताना राज्यपालांनी त्यांना कसे मुख्यमंत्री पदाची शपथ दिली - सिंघवी
  • राष्ट्रपती राजवट रात्रीत हटवली जाऊन लगेचच सकाळी कसे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शपथ देण्यात आली. राज्यपाल एका पक्षाला झुकते माप देत आहेत - कपिल सिब्बल
  • भाजपने आजच सभागृहात बहुमत सिद्ध करावे, कपिल सिब्बल यांची न्यायालयात मागणी
  • कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरू...

* आमचे सर्व आमदार पक्षाकडेच आहेत, त्यामुळे अजित पवारांना मी भेटण्यासाठी निघालोय की, त्यांनीही मागे यावे. अजित पवारांना समजावण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

* शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांचे संख्याबळ पुरेस आहे, आमचे सर्व ४४ आमदार सुरक्षित आहेत, ते फुटणार नाहीत - अशोक चव्हाण

* दोन्ही पक्षकारांचे वकील सर्वोच्च न्यायालयात पोहचले. कपिल सिब्बल शिवसेनेची भूमिका मांडणार, अभिषेक मनू सिंघवी हे काँग्रेसची बाजू मांडणार

* राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनात गेले होते, राज्यपाल उपस्थित नसल्याने आमदारांचे पत्र त्यांनी राजभवनात दिले.

* काही मिनिटात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अभिषेक मनू सिंघवी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक काय म्हणाले

  • विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, हे त्यांच्यासाठी चांगले होईल.
  • कालपर्यंत आमच्याकडे नसलेले आमदार आमच्यासोबत येत आहेत. संध्याकाळपर्यंत सर्व आमदार परत येतील
  • अजित पवारांची चूक झाली आहे हे खरे आहे, त्यांनी चूक मान्य करून मागे यावे.

आशिष शेलार पत्रकार परिषदेत राऊतांना काय म्हणाले -

  • वारंवार चुकीची वक्तव्ये करून तोंडावर पडलेल्या संजय राऊत यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये.
  • रामासाठी अयोध्येला जाणारे रामाला विसरले, रामप्रहराला विसरले.
  • आमच्यावर टीका करताना जरी त्यांनी सांगितले असले तरी, इंदिरा गांधीजींनी लावलेल्या आणीबाणीवर त्यांनी अप्रत्यक्ष टीकाच केली आहे. हे चांगले झाले, महाविकास आघाडी होण्यापूर्वीच ते असे बोलत असतील तर उद्या सत्तेत आल्यानंतर हे काय करणार हे दिसतंय
  • शिवसेनेविना आमच्याकडे १७० आमदारांचे बहुमत
  • अजित पवारांशी आमचा व्यवहार म्हणजे काळाबाजार आणि त्यांची काँग्रेस किंवा सोनिया गांधीशी जवळीक म्हणजे काय

* राष्ट्रवादीचे ४९ ते ५० आमदार आमच्यासोबत आहेत. अजून १ ते २ आमच्याकडे येतील, हे सर्व आमदार आमच्यासोबतच आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे सरकार १०० टक्के येईल याची खात्री असल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.

* राष्ट्रवादी काँग्रेस आमदार बबन शिंदे मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. जे कालच्या पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रवादीसोबत नव्हते.

संजय राऊत काय म्हणाले -

  • पुढील सात दिवस ईडी, एसीबी यांचा खेळ महाराष्ट्राला पाहायला मिळेल.
  • संजय राऊतला भाजपचे नेते मीडियाच्या माध्यमातून खुलेआम धमक्या देत आहेत
  • पहाटे ५ वाजता राष्ट्रपती राजवट हटवली जाते आणि पुढच्या तासाभरात शपथविधी उरकला जातो हे आणीबाणीतही झाले नाही.
  • कालचा शपथविधी हा 'अ‌ॅक्सिडेंटल' शपथविधी होता.
  • काल दोन-चार लोकांनी एकमेकांना लाडू भरवले ते त्यांच्या घशाखालीही उतरले नाहीत.
  • नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला तडे देण्याचे काम त्यांच्याच पक्षाचे नेते करत आहेत
  • बहुमत सिद्ध करायला गेल्यानंतर त्यांचा भांडाफोड होईल..
  • इंदिरा गांधीच्या आणीबाणीला काळा दिवस म्हणायला आता त्यांच्याकडे शब्द नाही, त्यांचं कृत्य त्याहून मोठं
  • शिवसेनेला २४ तासही दिले जात नाहीत, मात्र अजित पवार एक कागद घेऊन जातात आणि त्यावरून राज्यपाल त्यांना शपथ देतात.
  • अशी कामं पाकिट मारणारी लोकं करतात
  • राष्ट्रवादीच्या आमदारांना अजित पवारांनी फसवलं आणि अजित पवारांना भाजपनं फसवलं. या वयात शरद पवारांच्या पाठीत त्यांनी खंजिर खुपसला.
  • हा त्यांचा शेवटचा खेळ आहे, पण ते त्यात यशस्वी होणार नाहीत.
  • 165 चं बहुमत आमच्या कडे आहे, 5 जण बेपत्ता आहेत त्यांना डांबून ठेवलं
  • शनिवारचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस.
  • आम्हाला कधीही बहुमतासाठी बोलवा आम्ही तयार, पण ते बोलवणार नाहीत.
  • राज्यपालांचा आम्हाला एक आणि त्यांच्या पक्षाला एक न्याय, हे बरोबर नाही
  • तुमच्याकडे खरोखर बहुमत होतं तर, ३० तारखे पर्यंत कशाला थांबताय

* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना

* काँग्रेसच्या आमदारांना अंधेरीच्या जे एम मॅरीटो हॉटेलमध्ये हलवण्यात आले.

* भाजप खासदार संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला मुंबईत

* राज्यपालांच्या वार्षिक बैठकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राष्ट्रपती भवनात पोहचले.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपने शनिवारी सकाळी नाट्यमयरित्या सत्तास्थापनेचा दावा करत, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घडामोडीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. रिट याचिकेवर आज (रविवारी) साडेअकरा वाजता सुनावणी होणार आहे.

हेही वाचा -जयंत पाटील यांची विधीमंडळ नेतेपदी निवड अवैध-आशिष शेलार

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीकडे १५४ सदस्यांचे संख्याबळ असताना राज्यपालांनी या पाठिंब्याकडे दुर्लक्ष करून फडणवीस आणि पवार यांना शपथ दिली. हा शपथविधी बेकायदा असून ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

राज्यपालांनी फडणवीस यांना बहुमतासाठी ३० नोव्हेंबपर्यंतची मुदत दिली असली तरी बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन तातडीने रविवारीच बोलावले जावे आणि त्या कामकाजाचे चित्रीकरणही केले जावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

हेही वाचा -शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव; शपथविधी घटनाबाह्य असल्याचा आरोप

या गोष्टींवर असेल नजर -

* विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आता महत्त्वाची असणार आहे. अध्यक्षाच्या निवडीत कोणाकडे किती संख्याबळ आहे हे स्पष्ट होईल. अध्यक्षांची निवड ही गुप्त मतदान पद्धतीने होते. यात भाजपकडून अथवा इतर पक्षांकडून मतांची फाटाफूट होऊ शकते.

* अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. २०१४ मध्ये तो आवाजी मतदानाने मंजूर केला होता. यावेळीही भाजपकडून तसा प्रयत्न केला जाण्याची शक्यता

* विश्वासदर्शक ठरावावर फडणवीस सरकारची कसोटी लागेल, अजित पवारांच्या पाठिंब्यावर त्यांनी सत्तास्थापन केली असली तरी विश्वासदर्शक ठरावावेळी राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदरांनी मदत केली नाही तर भाजपची नाचक्की होईल.

* विश्वासदर्शक ठराव हा खुल्या मतदानाने घेतला जातो. या वेळी आमदारांना जागेवरून उभे राहून कोणाला मतदान करत आहे हे जाहीर करावे लागते. पक्षादेशाचा भंग केल्यास पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्रतेची कारवाई होते.

Last Updated : Nov 24, 2019, 2:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details