मुंबई -गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री पदाची धुरा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तसेच कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. तसे पत्रही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे पाठवले आहे. सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्यावर अवैधरित्या शंभर कोटी रुपये जमा करायला लावल्याचे आरोप, या प्रकरणामुळे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पुढचा गृहमंत्री म्हणून प्रवास हा खडतर असणार आहे. काही महत्वाच्या प्रश्नांना गृहमंत्री म्हणून त्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
हेही वाचा -मृत्यूच्या तीन वर्षानंतर मृत व्यक्तीचे दुसाऱ्यांदा शवविच्छेदन करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
सचिन वाझे प्रकरण
प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरा बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर देशभरात खळबळ माजली होती. या प्रकरणात मुंबई पोलीस, तसेच एटीएसने कारवाई सुरू केली, मात्र त्यातच स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण एक वेगळ्या वळणाकडे निघाले. या प्रकरणाचा तपास करणारा एपीआय सचिन वाझे हाच या प्रकरणात आरोपी असल्याने मुंबईसह महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खळबळ माजली होती. सचिन वाझे याच्यासह अजूनही काही पोलीस अधिकाऱ्यांची या प्रकरणात एनआयएकडून चौकशी करण्यात आली. तसेच, वाझे याला अटकही करण्यात आली. या सर्व प्रकरणामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग याला देखील पदावरून हटवण्यात आले. या सर्व प्रकरणामुळे मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची मोठी बदनामी झाली होती. त्यामुळे, या प्रकरणात गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांना जातीने लक्ष घालावे लागेल. पोलीस दलाची प्रतिमा कशी सुधारेल यासाठी महत्वाचे काम गृहमंत्री म्हणून त्यांना करावे लागणार आहे.
तडा गेलेल्या सरकारच्या प्रतिमेला सुधारण्याचे आव्हान