मुंबई - असल्फा व्हिलेज, खार दांडा येथील घरांचा कायापालट केल्यानंतर 'चल रंग दे' टीमने आपला मोर्चा वरळी नाका येथे वळवला आहे. येथील घरे सध्या वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगली आहेत. तसेच घराच्या भिंतींवर रंगीबेरंगी कोलाज केला गेला आहे. हा कोलाज सेना, नौसेना आणि वायुसेना यांना समर्पित करण्यात आला आहे.
'चल रंग दे' टीमने वरळी येथील घरांच्या भिंती रंगीबेरंगी कोलाजने रंगवल्या
सेना, नौसेना आणि वायुसेनेतील जवान कुठलाही स्वार्थ न बाळगता आपल्या देशाचे रक्षण करतात. घराच्या भिंती ज्याप्रकारे आपले रक्षण करतात त्याच प्रकारे जवानदेखील आपल्या देशाचे रक्षण करतात. एकप्रकारे ते संरक्षक भिंतीची भूमिका बजावतात.
सेना, नौसेना आणि वायुसेनेतील जवान कुठलाही स्वार्थ न बाळगता आपल्या देशाचे रक्षण करतात. घराच्या भिंती ज्याप्रकारे आपले रक्षण करतात त्याच प्रकारे जवानदेखील आपल्या देशाचे रक्षण करतात. एकप्रकारे ते संरक्षक भिंतीची भूमिका बजावतात. म्हणूनच 'चल रंग दे' च्या टीमने तिन्ही दलाला उद्देशणारा एक कोलाज साकारला आहे. यामध्ये जवळपास ३५० स्वयंसेवक सहभागी झाले होते.
'चल रंग दे' च्या संस्थापक देदिपिया रेड्डी यांनी याबाबत सांगितले की, जवान हे भारत देशाचे आणि भारतीयांचे रक्षण करतात. देशाच्या सुरक्षेसाठी ते बलिदान देतात. त्यांचे हे बलिदान प्रत्येक भारतीयाच्या लक्षात राहावे यासाठी आम्ही या घरांना हा रंग दिला आहे. आम्ही पांढरा, निळा आणि हिरवा, अशा तीन रंगांमध्ये या भिंती रंगवल्या आहेत. हे रंग सेना, नौसेना आणि वायुसेना या तिन्ही दलातील जवानांचे बलिदान आणि शौर्य दर्शवतात.