मुंबई -मध्य रेल्वेने कल्याण आणि हजरत निजामुद्दीन दरम्यान केवळ माल, पार्सल इत्यादीसाठी ट्रेन चालवण्याचे नियोजन केले आहे. मागणी वाढल्यास फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. जर संपूर्ण पार्सल ट्रेन सुरूवातीच्या ठिकाणी पार्टीद्वारे लोड केली गेली तर गंतव्य स्थानावर त्वरित पार्सल ट्रेन पोहोचू शकते.
कोणत्याही गंतव्यस्थानासाठी पार्टीकडून पूर्ण पार्सल ट्रेनची मागणी आल्यास, मध्य रेल्वे सेवा प्रदान करण्यासाठी तत्परतेने कार्य करेल. या सेवा 14 एप्रिल प्रवासापर्यंत वैध आहेत. पार्सल ट्रेन कल्याण येथून सकाळी 9 वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसर्या दिवशी दुपारी 3.40 वाजता पोहचेल. परतीच्या वेळी हजरत निजामुद्दीन येथून 12.30 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी सकाळी 11.10 वाजता कल्याण येथे पोहचेल.