मुंबई -मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाजवळ मालवाहून रेल्वे गाडीच्या इंजनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची कसारा दिशेकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल आहे.
दुसरे इंजिन जोडून गुड्स ट्रेन मार्गस्थ
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 21 सप्टेंबर) दुपारी 2 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास आसनगाव स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी पोहोचून बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही इनिंज सुरू होत नव्हते. अखेर दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सुमारास दुसरे इंजिन जोडून या मालगाडीला मार्गस्थ करण्यात आली. मात्र, तांत्रिक बिघाड झालेले इंजिन मध्य रेल्वेच्या कारशेडमध्ये आणण्यात आले आहे. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड कसा झाला याची चौकशी मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाकडून करण्यात येत आहे.