मुंबई- पाऊस आणि इतर कारणांनी वारंवार खोळंबणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. आज सकाळी मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, थोड्याच वेळात ही फांदी हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. पण ही वाहतूक उशिराने सुरू आहे.
ओव्हरहेड वायरवर फांदी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुलुंड स्थानकात आज सकाळी ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ही फांदी हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली आहे. मात्र, ही वाहतूक उशिराने सुरू आहे.
मुंबई
शनिवारी सकाळी मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर झाडाची फांदी तुटून ओव्हरहेट वायरवर पडली. त्यामुळे मध्य रेल्वेची सीएसएमटीवरून कल्याणला जाणारी वाहतूक खोळंबली आहे. या खोळंब्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. लोकलच्या छतावर पडलेले झाड काढण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.