मुंबई :लोकल आहे, म्हणून निश्चित वेळात आपण पोहचू हा विश्वास प्रत्येक लोकल प्रवाश्यांच्या मनात आहे. तसेच दर रविवारी सवयीप्रमाणे आपण मेगाब्लॉकला सामोरे जातो. मेगा ब्लॉकअसल्यामुळे वीस मिनिटे ते 25 मिनिटे आधीच आपल्याला रेल्वे स्टेशनवर जावे लागते. ट्रेन पकडून गर्दीमध्ये कशीतरी वाट काढून प्रवास करावा लागतो. दर रविवारी मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या फेऱ्या कमी (Central Railway Mega block) होतात. काही रेल्वे स्थानकांवर ट्रेन थांबत नाही. कारण मेगाब्लॉकमुळे काम सुरू असते. हा मेगा ब्लॉक कसा सुरू झाला ? मेगाब्लॉक किती गरजेचा ? की मेगाब्लॉक नको ? याचा ऊहापोह आपण समजून घेऊ (Mega block needs alternative to new technology) या.
वीस वर्षापासून मेगाब्लॉक नियमित : मेगा ब्लॉक साधारणत: 20 ते 25 वर्षापासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरू झाला. त्याचे कारण असे की, जेव्हा ओव्हरड वायर आणि रूळ मार्ग आणि विविध तांत्रिक गोष्टीमुळे रेल्वेच्या अडचणी समोर यायला लागल्या. या अडचणींना सोडवण्यासाठी मध्य रेल्वे महामंडळाद्वारे निर्णय घेतला गेला की, दर रविवारी देखभाल आणि दुरुस्ती केल्याशिवाय बारा महिने विनाअडथळा रेल्वे धावू शकणार नाही, असा रेल्वे महामंडळाचा दावा (Mega block needs alternative) आहे.
रेल्वे प्रशासन : यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्यासोबत संपर्क साधून ईटीव्ही भारत वतीने मेगाब्लॉक कशासाठी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, रविवारी मेगाब्लॉक आयोजित केला जातो. कारण रेल्वे यंत्रणा खूप मोठी आहे. त्यामध्ये रेल्वे मार्ग सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर आणि इतर तांत्रिक बाबी असतात. ज्यांची वेळेवर दुरुस्ती किंवा देखभाल व्हायला हवी. तांत्रिक दोष त्याच वेळेला ठीक केले, तर प्रचंड लोकसंख्येला घेऊन जाणारी लोकल बिघडू नये. कोणत्याही तांत्रिक कारणामुळे अचानक थांबू नये, हा त्यामागे उद्देश असतो. जर आपण देखभाल दुरुस्ती व्यवस्थित केली तर लाखो लोकांना घेऊन जाणाऱ्या रेल्वे सुरळीत सुरू राहतील. अन्यथा मध्येच रेल्वे बंद पडू शकतात. त्याचे कारण रेल्वेचा ट्रॅक, ओव्हर हेड वायर सिग्नल यंत्रणा जी बाराही महिने व्यवस्थित काम करते. ती अचानक बंद पडू शकते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कसाऱ्याला जाणारी शेवटची लोकल साडेबाराची आहे. ती तिकडे सकाळी अडीचला पोहोचते आणि थोड्याच वेळात तिथून लोकल निघालेली असते. त्याच्यामुळे काम करण्यासाठी पुरेसा वेळ मध्यरात्री मिळत नाही, असा आमचा अनुभव (Central Railway Mega block in Mumbai) आहे.