मुंबई -गेल्या महिनाभरात 34 हजार 497 वॅगनमध्ये कोळशाची तर 25 हजार 380 कंटेनरची लोडींग करण्यात आली. आवश्यक वस्तू आणि मालाची वेळेवर वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. याप्रसंगी रेल्वे कर्मचारी समर्पणाने उत्कृष्ट कार्य करीत आहेत.
महिन्याभरात मध्य रेल्वेकडून साडेतीन दशलक्ष टन मालाची वाहतूक
लॉकडाऊन कालावधीत, मध्य रेल्वे देशभरात अत्यावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा सुनिश्चित करून कोरोनाशी झुंज देत आहे. कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी प्रवासी सेवा थांबविल्या असल्या तरी अन्नधान्य, औषध, कोळसा, पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि इतर आवश्यक वस्तुंची वाहतूक सुरू आहे.
लॉकडाऊन कालावधीत, मध्य रेल्वे देशभरात अत्यावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा सुनिश्चित करून कोरोनाशी झुंज देत आहे. कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी प्रवासी सेवा थांबविल्या असल्या तरी अन्नधान्य, औषध, कोळसा, पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि इतर आवश्यक वस्तू जसे की दूध, भाजीपाला आणि अन्य आवश्यक आपत्कालीन सेवांचा पुरवठा मालगाड्या, विशेष पार्सल गाड्यांमधून भारतीय रेल्वेतून सुरू आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग, अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर सुमारे 75 रॅक हाताळले जात आहेत. विविध गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील मध्य रेल्वेचे कर्मचारी मालगाडी सुरक्षित आणि सुरळीत चालविण्यासाठी 24 तास 7 दिवस सतत कार्यरत आहेत.
मध्य रेल्वेने 23 मार्च ते 22 एप्रिल पर्यंत 1 हजार 415 रॅक मधून 70 हजार 374 वॅगनद्वारे 3.686 दशलक्ष टन जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक केली. या कालावधीत, मध्य रेल्वेने 34 हजार 497 वॅगनमध्ये कोळसा आणि 25 हजार 380 वॅगनमध्ये कंटेनर भरले. जे मध्य रेल्वेवरील एकूण लोडिंगच्या अनुक्रमे जवळपास 50 व 36 टक्के इतके आहे. याच कालावधीत मध्य रेल्वेने कोळशाच्या दररोज 1 हजार 113 वॅगनसह एकूण 2 हजार 270 वॅगन दररोज लोड केले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने 25 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत 551 रॅकमध्ये 21 हजार 867 वॅगनच्या माध्यमातून 2.296 दशलक्ष टन कोळसा भरून पाठविला.