मुंबई: सन १८५३ पासून आजपर्यंत, जसजशी वर्षे निघून गेली, तसतशी पहिली ट्रेन चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे १९०० मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली . उत्तरेकडे दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद तसेच पूर्वेला नागपूरपासून व दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत त्याच्या सीमांचा विस्तार केला. निजाम, सिंधिया आणि ढोलपूर ही राज्य एकत्र करून ५ नोव्हेंबर १९५१ रोजी मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या ५ विभागांसह मध्य रेल्वेचे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,२१९ मार्ग किलोमीटरपेक्षा जास्त नेटवर्क आहे. मध्य रेल्वे या राज्यांना ४७१ स्टेशन्सद्वारे सेवा देते. निर्मितीच्या वेळचे मूळ लोडिंग १६.५८ दशलक्ष टन होते. ते आता २०२२-२३ मध्ये ८१.८८ दशलक्ष टन झाले आहे. जे आतापर्यंतचे सर्वांत अधिक आहे.
या गाड्या पहिल्यांदा धावल्या:एप्रिल १८५३ मधील पहिल्या ट्रेनपासून ते भारतातील सर्वांत आधुनिक ट्रेनपर्यंत, गेल्या १७० वर्षांमध्ये रेल्वेने आपले नेटवर्क मोठ्या क्षेत्रापर्यंत वाढवले आहे. ती १०० वर्षांनंतरही प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहेत. १० फेब्रुवारी २०२३ रोजी, वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवला, जेथून आशियातील पहिली ट्रेन निघाली होती. हा वारसा आणि विकासाचा परिपूर्ण संगम आहे. शताब्दी एक्सप्रेस, जन शताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस या मध्य रेल्वेवर सर्वांत आधी धावल्या आहेत.