मुंबई:मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक जेव्हा केला जातो. त्यादरम्यान रेल्वे रुळाच्या आजूबाजूची सफाई आणि त्याचबरोबर फुल शेती आणि सुशोभीकरण असे अनेक काम करण्याचा संकल्प केला, आणि त्याला सुरुवात केली. येत्या मार्च 2023 पर्यंत 50000 झाडांची रोपे लावण्याच्या संकल्पाला सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेने आपल्या प्रवासी जनतेसाठी पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Central Railway: मध्य रेल्वेने रुळाच्या बाजूला फुलविली फुलशेती, सुशोभिकरण पाहून प्रवासी सुखावले! - 50000 रोपटे लावण्याची सुरुवात
Central Railway: मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक Megablock जेव्हा केला जातो. त्यादरम्यान रेल्वे रुळाच्या आजूबाजूची सफाई आणि त्याचबरोबर फुल शेती आणि सुशोभीकरण असे अनेक काम करण्याचा संकल्प केला, आणि त्याला सुरुवात केली.
मेगा ब्लॉकच्या दरम्यान नियमित देखभाल:त्यासाठी त्यांनी मुंबई विभागीय भागामध्ये काही हरित उपक्रम राबवण्याबाबत राष्ट्रीय सेवा योजना आणि रोटरी क्लब सहाय्याने मार्च 2023 पर्यंत हरित उपक्रम राबवण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. त्याला सुरुवात देखील केली आहे. दर मेगा ब्लॉकच्या दरम्यान नियमित देखभाल दुरुस्ती केली जाते. रुळांची साफसफाई करणे रेल्वे रुलांवरील नको असेल, वनस्पती कोरडे गवत, चिखल बाजूला करणे, माती आणि खताचे नूतनीकरण करणे, नवीन रोपटे लावणे, मोठे रोपटे झालेले असेल, तर त्याची छाटणी करणे, त्यांना नियमित पाणी देणे.
50000 रोपटे लावण्याची सुरुवात: यासह आता रेल्वेच्या आजूबाजूला हरित मुंबई करण्यासाठी मध्य रेल्वेकडून राष्ट्रीय सेवा योजना. तसेच रोटरी क्लब यांच्या सहकार्यातून 50000 रोपटे लावण्याची सुरुवात झालेली आहे. आणि येत्या 6 महिन्यात हा संकल्प पूर्णत्वास नेले जाणार आहे.याबाबत मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी सांगितले आहे की, आता आम्ही सुरुवात केली आहे. पर्यवरणपूरक वातावरण निर्मितीसाठी हे करत आहोत. मुंबई विभागामध्ये मध्य रेल्वेच्या इगतपुरी ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान महत्त्वाचे 'हरित बगीच्यामध्ये आयुर्वेदिक औषधे वनस्पतीची अशा जवळजवळ 120 ते 470 विविध रोपटे लावण्याचा हा संकल्प आहे.