मिठी नदी, नाले भरल्यामुळे रुळावर पाणीः मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण - drainage water
मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी मिठी नदी ओव्हर फ्लो झाल्याने व नाल्याचे पाणी रुळावर आल्याने लोकलसेवा प्रभावित झाल्याचे सांगितले. तर हवामान खात्याने अतिवृष्टी होणार असल्याची सूचना दिल्याने रविवारचे वेळापत्रक चालवले असेही ते म्हणाले
मुंबई -शहरात 2 व 3 जुलैला पडलेल्या पावसाचा सर्वात मोठा फटका मध्य व हार्बर मार्गावरील प्रवाशांना बसला. यानंतर मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक चालवून टीकेचे धनी होण्यात समाधान मानले. मात्र, आज मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी मिठी नदी ओव्हर फ्लो झाल्याने व नाल्याचे पाणी रुळावर आल्याने लोकलसेवा प्रभावित झाल्याचे सांगितले. तर हवामान खात्याने अतिवृष्टी होणार असल्याची सूचना दिल्याने रविवारचे वेळापत्रक चालवले, मात्र, अंदाज चुकल्याचे स्पष्टीकरण दिले.