मुंबई -शहर आणि परिसरात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आवश्यक वस्तू अखंडितपणे मिळण्यासाठी मालवाहतूक आणि संपूर्ण भारतभर निवडक विशेष प्रवासी गाड्या चालवण्या व्यतिरिक्त, मध्य रेल्वेने लॉकडाऊन कालावधीचा उपयोग करून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा कामे पूर्ण केली आहेत. लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने 14 पादचारी पुलांचे स्टील गर्डर उभारणीसाठी आणि 9 पादचारी पुलांच्या जुन्या स्टील स्ट्रक्चर्स काढून टाकण्याकरता 23 ठिकाणी पायाभूत सुविधांचे काम करण्यात आले. या 23 महत्त्वपूर्ण पायाभूत कामांमध्ये मुंबई विभागातील 7, भुसावळ विभागातील 10, नागपूर व सोलापूर विभागात प्रत्येकी एक, पुणे विभागातील 3 आणि निर्माण शाखेतील एक काम होते.
तपशील खालीलप्रमाणे :
मुंबई विभाग - डोंबिवली स्थानकात 6 मीटर रुंद आणि बेलापूर स्थानकाजवळ 3.66 मीटर रुंद मध्यभागी पादचारी पूलाच्या, गर्डरची उभारणी करण्यात आली. वडाळा रोड येथील पादचारी पुलाचे 2 जीर्ण पोलादी स्पॅन, अंबरनाथ येथे पादचारी पुलाचा एक स्पॅन, अंबिवली येथे पादचारी पुलाचा एक स्पॅन, आटगाव येथे पादचारी पुलाचे 2 स्पॅन काढून टाकण्यात आले. वाशिंद रेल्वे स्थानकात 100 वर्षांहून अधिक जुन्या पादचारी पुलाचे दोन स्पॅन तोडण्यात आले.
नागपूर विभाग - वर्धा स्थानकावर 16 रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या 6 मीटर रुंद पादचारी पुलाच्या गर्डरचे 6 स्पॅन उभारण्यात आले.