महाराष्ट्र

maharashtra

चित्रीकरणातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत 1.33 कोटींचे उत्पन्न जमा

मध्य रेल्वेच्या विविध स्थानकात 2019 -20 या वर्षांत सुमारे 21 चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक येथे ‘पंगा’ चित्रपटासह 8 चित्रपटांच्या चित्रीकरणातून 44. 52 लाख रुपये उत्पन्न मिळाले. तर, आपटा स्थानकात करण्यात आलेल्या 4 चित्रपटाच्या चित्रीकरणातून 22. 61 लाख रुपये उत्पन्न जमा झाले.

By

Published : Jul 30, 2020, 7:04 PM IST

Published : Jul 30, 2020, 7:04 PM IST

चित्रीकरणातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत 1. 33 कोटी उत्पन्न जमा
चित्रीकरणातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत 1. 33 कोटी उत्पन्न जमा

मुंबई -चित्रपट, जाहिराती आणि लघु चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी रेल्वे स्थानकेदेण्यात येतात. या माध्यमातून रेल्वेला बरेच उत्पन्न मिळत असते. मध्य रेल्वेच्या स्थानकांवर करण्यात आलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणातून 2019 - 2020 या आर्थिक वर्षांत मध्य रेल्वेच्या तिजोरीत 1. 33 कोटी उत्पन्न जमा झाले आहेत.

भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या मार्गांवर, वेगवेगळ्या स्थानकांवर चित्रपटांचे चित्रीकरण होते. त्यात सर्वाधिक पसंती मध्य रेल्वेला दिली जाते. चित्रपट निर्मात्यांचा रेल्वेस्थानक आणि परिसरात चित्रीकरण करण्याकडे कल वाढत असल्याने रेल्वेलादेखील चांगला फायदा होत आहे. दरवर्षी विविध चित्रपटांतून अनेक रेल्वे स्थानके दर्शकांना पाहायला मिळतात. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, चेन्नई एक्सप्रेस, जब वी मेट किंवा गली बॉय अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये रेल्वे स्थानकाचे दृष्य कैद करण्यात आले आहे. यातून रेल्वेलाही बरेच उत्पन्न मिळत असते.

मध्य रेल्वेच्या विविध स्थानकात 2019-2020 या वर्षांत सुमारे 21 चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक येथे ‘पंगा’ चित्रपटासह 8 चित्रपटांच्या चित्रीकरणातून 44. 52 लाख रुपये उत्पन्न मिळाले. तर, आपटा स्थानकात करण्यात आलेल्या 4 चित्रपटाच्या चित्रीकरणातून 22.61 लाख रुपये उत्पन्न जमा झाले. पनवेल स्थानकात चित्रीकरण करण्यात आलेल्या रजनीकांत स्टार फिल्म ‘दरबार’कडून सर्वाधिक 22.10 लाख रुपये उत्पन्न मिळविले. पुणे विभागातील निसर्गरम्य वाठार स्थानकात सलमान स्टारर ‘दबंग 3’ याच्या परवानगी आदी शुल्कासाठी 15.62 लाख रुपये, तर इतर 3 चित्रपटांमधून 37.22 लाख रुपये उत्पन्न मिळाले. पुणे ते मुंबई दरम्यान ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे चित्रीकरण, तुर्भे आणि वाडी बंदर यार्ड, पुणे स्थानक यासारख्या चित्रपटाच्या शूटिंग ठिकाणांमधूनही चांगले उत्पन्न मिळाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details