मुंबई-अंधेरीतील गोखले पूल व सीएसटी येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. धोकादायक पूल कोसळून दुर्घटना होण्यापेक्षा त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम रेल्वेने हाती घेतले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील रेल्वेमार्गावरचे ९ धोकादायक पूल बंद - रेल्वे
रेल्वे व आयआयटीने केलेल्या पाहणीत मध्य रेल्वे मार्गावरील २९९ पुलांपैकी २७६ पुलांचे सेफ्टी ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. यापैकी प्रवाशांच्या दृष्टीने धोकादायक असलेले ९ पूल मध्य रेल्वेने बंद केले आहेत.
रेल्वे व आयआयटीने केलेल्या पाहणीत मध्य रेल्वे मार्गावरील २९९ पुलांपैकी २७६ पुलांचे सेफ्टी ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. यापैकी प्रवाशांच्या दृष्टीने धोकादायक असलेले ९ पूल मध्य रेल्वेने बंद केले आहेत. कुर्ला स्थानकातील कल्याण दिशेकडील पूल, दिवा स्थानकातील सीएसएमटी दिशेकडील पूल, कल्याण स्थानकातील लोकमार्ग पूल, ठाणे विद्याविहार स्थानकातील पूल व बॉम्बे पोर्ट ट्रस्ट अंतर्गत येणारे 2 पूल रहदारीसाठी बंद करण्यात आले.
लवकरच हे पूल तोडण्यात येणार असून तेथे नवीन पुलाचे बांधकाम होइल. आयआयटीने केलेल्या पाहणीत सदर पूल धोकादायक आढळले होते. त्यामुळे ते बंद करण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ.ए.के. सिंग यांनी सांगितले आहे.