मुंबई- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागांत स्टेशन परिसरातील गरजू लोकांना सुमारे 1 हजार अन्नाची पाकिटे वाटली. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक आणि मुंबई सेंट्रल, मुंबई येथील आयआरसीटीसी बेस किचनमध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी जेवण (डाळ खिचडी) तयार केली जात आहे.
आरोग्यविषयक मानदंडांचे पालन करून खाद्यपदार्थांची सुमारे 2000 पाकिटे तयार केली जात असून वाणिज्यिक विभाग आणि आरपीएफमार्फत त्याचेवितरण केले जात आहे. याव्यतिरिक्त, कॅटरिंग स्टॉलमालक, वाणिज्य विभाग कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी अन्न पाकिटे वितरणात वैयक्तिक मदत करत आहेत.