मुंबई- राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी वस्त्रसंहितेचा (ड्रेसकोड) नियम केला आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली असून ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? असा प्रश्न केला आहे.
राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी वस्त्रसंहितेचा (ड्रेसकोड) नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? असा प्रश्न रामदास आठवले यांनी ट्विट करून विचारला आहे. राज्य सरकारने मंत्रालयासह सर्व कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचे आदेश काढले आहेत.कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची वेगळी ओळख असावी, यासाठी ठराविक रंगाचा ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.