मुंबई - सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात कोणतेही राजकारण नाही, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. स्टार असो की नसो, प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. सुशांतसिंह अल्पावधीत लोकप्रिय अभिनेता झाला. त्याचा मृत्यू झाला नसता तर तो भविष्यात सुपरस्टार झाला असता. त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी, ही रास्त मागणी असून यात कोणतेही राजकारण नाही, असे आठवले म्हणाले.
मुंबई पोलिसांचा संपूर्ण जगात नावलौकिक आहे. मात्र, यापूर्वी अनेक प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, असा अर्थ कोणी काढू नये. या प्रकरणाची मुंबई पोलीस करीत असलेल्या चौकशीत मुंबई पोलिसांच्या नावलौकिकाला न शोभणारी संथगती आहे, असे आठवले म्हणाले.