मुंबई :मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. देशाची आर्थिक राजधानी अशी या शहराची ओळख आहे. एकेकाळी अंडरवर्डची या मुंबईवर नजर होती. राजकारण्यांची नजर तर असतेच आणि दहशतवाद्यांची नजर देखील असते. हे 26- 11 च्या हल्ल्यात आपण पाहिलेले आहे. मात्र, पुन्हा एकदा मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचे वृत्त होते. त्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एनआयएने गुप्त माहितीच्या आधारे संशयित दहशतवादी सरफराज मेननला इंदूरमधून अटक करण्यात आली आहे.
सरफराजमेनन मुंबईत :प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने मुंबई पोलिसांना एका ईमेलद्वारे मुंबईवरील दहशदवादी हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, आधी पाकिस्तान मग चीन आणि नंतर हाँगकाँग या शहरात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेला सरफराज मेमन नावाचा एक प्रशिक्षित व्यक्ती मुंबई शहरात आलेला होता. त्यामुळे एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा मेसेज देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित व्यक्ती सरफराज मेनन हा मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी असून एनआयएने त्या व्यक्तीचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट मुंबई पोलिसांना ईमेलद्वारे पाठवले आहेत. परंतु त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशी महाराष्ट्र एटीएस करणार आहे.