महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्रातले सरकार अल्पसंख्याक आणि दलितविरोधी सरकार : मिलिंद देवरा  - congress mumbai

भाजपने देशातील लोकशाही आणि संविधान पायदळी तुडवले असून, हे अल्पसंख्याक आणि दलितविरोधी सरकार आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस सक्षम पर्याय देईल, असे काँग्रेसचे मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

मिलिंद देवरा

By

Published : Mar 26, 2019, 5:56 PM IST

मुंबई - भाजपने देशातील लोकशाहीआणि संविधान पायदळी तुडवले असून, हे अल्पसंख्याक आणि दलितविरोधी सरकार आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस देशाला सक्षम पर्याय देईल, असे काँग्रेसचे मुंबईचे नवनियुक्तअध्यक्ष मिलिंद देवरा यांनी 'ईटीव्ही भारत'शीबोलतानासांगितले.

मिलिंद देवरा

काही महिन्यांपर्यंत लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सकारात्मक नसलेले मिलिंद देवरा यांना काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच उमेदवारी जाहीर केली. मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून निवडणुकीच्या काळातच एकाच वेळी दुहेरी लाभ पक्षाने त्यांना मिळवून दिला आहे. आज सकाळी आठ वाजता त्यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमीला भेट दिली.

त्यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलतानादेवरा म्हणाले, भाजपने देशातली लोकशाहीआणि संविधान पायदळी तुडवले आहे. हे सरकार अल्पसंख्याक आणि दलितविरोधी आहे. एका बाजूलादलितांचेपाय धुण्याचे नाटक करुन जातीयवाद्यांनीदलितांचेपाय तोडले आहेत.

त्यानंतर त्यांनी माहीम येथे असलेल्या मगदूम शाहबाबा दर्ग्याला जाऊन चादर चढविली. त्यावेळी त्यांनी अल्पसंख्याकसमाजाच्या उध्दारासाठी काँग्रेसला साथ देण्याची मागणी केली. माहीम येथेच असलेल्या सेंट मायकल चर्चलाहीभेटदिली.शेवटी वाळकेश्वर येथे असलेल्या बाबू अमीचंद पनाला या जैन मंदिराला भेट देऊनदर्शनघेतले. जैन मंदिराच्या दर्शनानंतर त्यांनी कुपरेज स्टेडियममध्ये असलेल्या पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कामाला सुरुवात केली.

मुंबईत गृहनिर्माणाची मोठीसमस्या

भाडेकरु, झोपडपट्टीवासियांना त्यांचे हक्क मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि सध्याचे अध्यक्ष राहुल गांधींचेही त्यांनी आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details