मुंबई- वांद्रे येथे जमलेल्या लोकांना पांगवण्यात आले आहे. २१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आपापल्या राज्यात जाता येईल, अशी मुंबईतील मजुरांची मानसिकता होता. मात्र, परराज्यातून आलेल्या कामगारांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. या कामगारांना अन्न आणि निवाऱ्याची गरज नाही. त्यांना फक्त आपल्या घरी जायचे आहे, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
स्थलांतरित कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही- आदित्य ठाकरे - mumbai
आज वांद्रे रेल्वेस्थानकावर दुपारच्या सुमारास मोठ्या संख्येने परराज्यातून आलेल्या कामगारांची गर्दी जमली होती. यामुळे लॉकडाऊनचे तीन-तेरा वाजले होते. मात्र, पोलिसांनी ही गर्दी वेळीच पांगवली. या घटनेबाबत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारलाच जबाबदार धरले आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून केंद्रावर निशाणा साधला आहे.
आज वांद्रे रेल्वेस्थानकावर दुपारच्या सुमारास मोठ्या संख्येने परराज्यातून आलेल्या कामगारांची गर्दी जमली होती. यामुळे लॉकडाऊनचे तीन-तेरा वाजले होते. मात्र, पोलिसांनी ही गर्दी वेळीच पांगवली. या घटनेबाबत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारलाच जबाबदार धरले आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून केंद्रावर निशाणा साधला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित झाले त्या दिवसापासून भारतीय रेल्वे बंद आहे. स्थलांतरित कामगारांना आपापल्या गावी परत जाता यावे यासाठी राज्याने भारतीय रेल्वेला २४ तासांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची विनंती देखील केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडला होता, असे आदित्या ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तसेच, केंद्र सरकारच्या परस्पर सहयोगाने मोठ्या संख्येत स्थलांतर केलेल्या कामगारांना त्यांच्या गावी सुरक्षितरित्या पोहोचवता येईल. यबाबत राज्याकडून केंद्राला वारंवार पाठपुरावा केला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी बांद्रा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.