मुंबई :दिवाळीच्या तोंडावर मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट (Central and Western Railway platform ticket) दर दहा रुपये वरून 50 रुपये वाढवलेले होते. त्याप्रमाणे पश्चिम रेल्वेने देखील आपल्या रेल्वे मार्गावरील प्लॅटफॉर्म तिकीट दर पन्नास रुपये पर्यंत केले होते. मात्र हे तिकीट दर 1 नोव्हेंबर पासुन पूर्वत दहा रुपये (ticket fares will be normal again Rupees Ten) होणार आहे.
सणासुदीच्या हंगामात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता, प्लॅटफॉर्म आणि एफओबीसह रेल्वे आवारातील प्रवाशांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 10 रुपयांवरुन 50 रुपये पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.