मुंबई:सध्या महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांवर ईडीचे धाडसत्र सुरू असून या कारवाईवर संजय राऊत यांनी 'कितीही दबाव आणा आम्ही झुकणार नाही' असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील तीन दिवसांपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी ED च्या अधिकाऱ्यांचे तपास कार्य सुरू असून या कारवाईवरून शिवसेनेत प्रचंड संतापाची लाट आहे.
Sanjay Raut on raids : केंद्रिय एजन्सींना केवळ महाराष्ट्रातच काम आहे - संजय राऊत - Shiv Sena leader Sanjay Raut
केंद्रिय एजन्सींना (Central agencies) केवळ महाराष्ट्रातच काम ( have work only in Maharashtra) आहे. उर्वरित भारतात त्यांना कोणतेही काम नाही ते काय शोधत आहेत ते शोधू द्या आम्ही पाहत आहोत जनताही पाहत आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी आज व्यक्त केली आहे. राज्यातील नेते आणि मंत्र्यांवर आयकर विभागाचे छापे पडत आहेत त्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.
नेमकं काय म्हणाले राऊत ?
"देशाचा तिजोरीत सर्वात जास्त महसूल महाराष्ट्रातून जातो त्यामुळे इन्कम टॅक्स फक्त महाराष्ट्रातच आहे असा तपास यंत्रणांचा समज झाला आहे. त्यामुळेच कदाचित अधिकारी फक्त महाराष्ट्रातच धाडी टाकत असावेत. पण, यांच्या दबावापुढे आम्ही झुकणार नाही या सर्व हुकूमशाहीची नोंद जनता ठेवत आहे."
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे दबाव
"आशियातील सगळ्यात मोठी महानगरपालिका अशी मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. या महानगरपालिकेवर भाजपला सत्ता हवे आणि त्यासाठीच दबाव आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतोय आम्ही वाकणार नाही."
भाजपची भूमिका दुटप्पी
"आज मराठी भाषा दिवस आहे. पण, मराठी माणसा संदर्भात भाजपचे नेहमीच दुटप्पी भूमिका राहिली आहे. एका बाजूला मराठी माणूस, मराठी माणसांचे हक्क अशी ओरड करायची आणि दुसऱ्या बाजूला मराठी माणसाला विरोध करायचा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यायचा नाही, अशी दुटप्पी भूमिका भाजपची नेहमीच राहिली आहे." "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात सुद्धा हे लोक राजकारण करत आहेत. आम्हाला श्रेया नको श्रेय कोणीही घ्या पण आमच्या मराठीचा मान राखा. भाजपचे नेते आणि पंतप्रधान सतत छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करत असतात. पण, त्याच महाराजांच्या भाषेसाठी आम्हाला दिल्ली दरबारी भीक मागावी लागत आहे." असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा :IT Raid On Yashwant Jadhav : तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरूच