मुंबई: महिलांचे, मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य दिलेच पाहिजे. आता तर सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या विरोधात ज्या घटना घडत आहेत, त्याबाबत राज्यसरकार गंभीर नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
वस्तीगृहामध्ये सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे :सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी महिला आणि मुलींचे वसतीगृह असेल त्या ठिकाणी सुरक्षा संदर्भातील सर्व यंत्रणा वापरली गेली पाहिजे. वसतिगृह परिसरात कॅमेरा, योग्य लॉकींग सिस्टीम त्यासोबत मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. देशात मुली आणि महिलांसंदर्भात वारंवार ज्या घटना घडत आहेत, त्यावरून केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. आता तरी सरकारने वस्तीगृहात अलार्म बेल, कॅमेरे, हेल्पलाइन नंबर आणि मुली महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने पावले उचलावी.
केंद्रसरकारचे गैरव्यवस्थापन: वाढत्या अन्नधान्यांच्या किमती विरोधात गेल्या दोन वर्षांपासून संसदेत सातत्याने आम्ही बोलत आहोत. डाळींचे दर वाढले आहेत. केंद्रसरकार जवळ स्टडी पॉलिसी नसल्याचे दिसत आहे. कांद्याचे उत्पन्न आपल्याकडे जास्त वाढले होते, तेव्हा जगात कांद्याची मागणी होती. त्यावेळेस आम्ही कांदा निर्यात करा असे वारंवार सांगत होतो तसे केले नाही. त्यामुळे कांद्याचे भाव पडल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामध्ये केंद्रसरकारचे सातत्याने गैरव्यवस्थापन दिसून येते आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून सारखे वातावरण दूषित का होते आहे? असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे.