महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवर सिमेंट मिक्सर उलटला - विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड अपघात

ठाण्याच्या दिशेला जाणारा सिमेंट मिक्सर विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवरील गांधीनगर पुलावर उलटला. त्यामुळे पुलावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे. वाहतूक विभागाचे कर्मचारी आणि मुंबई अग्निशमन दलाचे जवान हा पलटी झालेला सिमेंट मिक्सर रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम करत आहे.

उलटलेला सिमेंट मिक्सर

By

Published : Oct 25, 2019, 9:41 AM IST

मुंबई -ठाण्याच्या दिशेला जाणारा सिमेंट मिक्सर विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवरील गांधीनगर पुलावर उलटला. त्यामुळे पुलावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे. वाहतूक विभागाचे कर्मचारी आणि मुंबई अग्निशमन दलाचे जवान हा पलटी झालेला सिमेंट मिक्सर रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम करत आहे.

विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवर सिमेंट मिक्सर उलटला


मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या कामाकरता हा सिमेंट मिक्सर पवईकडून ठाण्याच्या दिशेला जात होता. पहाटेच्या वेळी ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मिक्सर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

हेही वाचा- 'एक नारी, पड गयी सब पर भारी'... प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांचा जल्लोष!


अग्निशामक दलाचे जवान रस्त्यावर पडलेला सिमेंट मिक्सर बाजूला करण्याचे काम करत आहेत. लवकरच पुलावरील वाहतूक पुर्ववत होईल, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details