महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पारंपरिक पद्धतीने होणार गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन - gudi padwa

दरवर्षी नववर्षानिमित्त मुंबईत होणाऱ्या नववर्ष शोभायात्रा यंदा कोरोनामुळे होणार नाहीत. यंदा विविध सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यांनी पारंपरिक रिती-रिवाजानुसार गर्दी न करता साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा
गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा

By

Published : Apr 13, 2021, 6:51 PM IST

मुंबई - हिंदू नववर्ष समजला जाणाऱ्या गुढीपाडवात गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाचा प्रभाव असल्याने अनेकजण घरीच गुढी उभी करून नववर्षाचे स्वागत केले. दरवर्षी गिरगाव, लालबाग -परळ, विलेपार्ले आदी मराठी बहुलभागात शोभायात्रा काढल्या जातात. यंदा त्या रद्द केल्या असून पारंपरिक रिती-रिवाजानुसार गर्दी न करता मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

दरवर्षी मुंबईसह राज्यभरात थाटात गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. तसेच हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगाव, लालबाग- परळ, वरळी, विलेपार्ले, अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आदी मराठी भाषिक बहुलभागात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढली जाते. शोभायात्रेसाठी अनेक मुंबईकर मोठी गर्दी करतात. पारंपारिक पोषाख, चलचित्रांचा देखावा व ढोल-ताशांच्या गजर, चित्ररथ, मर्दानी खेळ, बाईक रॅली, ढोल-ताशा, लेझीमच्या तालावर तरुणाई हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रा काढली जाते. रस्त्यावर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. यंदा कोरोनामुळे राज्यासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्राही आयोजकांकडून रद्द करण्यात आल्या आहेत.

साधेपणाने गुढीपाडवा साजरा
साधेपणाने गुढीपाडवा साजरा...दरवर्षी मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा करतो. यंदा कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य सरकारच्या सूचनेनुसार लालबाग परळ या गिरणगावातील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन करत घरी राहून उत्सव साजरा करावा, असे आवाहन गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठानचे रुपेश पवार यांनी केले आहे.
नियमांचे पालन करा
नियमांचे पालन करा...कोरोनामुळे गेल्यावर्षी आनंदावर विरजण पडले. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने उत्सवावर निर्बंध आले आहेत. मात्र, शासनाच्या कठोर नियमांचे पालन करून गुढीपाडवा पाडवा उत्सव साजरा करणार आहोत, असे विक्रोळी येथील मठमंदिर सांस्कृतिक संवर्धन समितीचे प्रथमेश राणे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details