धर्मवीर सामाजिक संस्थेकडून मानखुर्दमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला - मुंबई बातमी
आज संपूर्ण भारतात दहीहंडीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. देशात व मुंबईत विविध ठिकाणी वेगवेगळ्या धार्मिक परंपरेनुसार दहीहंडी साजरी करण्यात आली. मुंबईत आज दहीहंडीचा उत्साह शहरात व उपनगरात शिगेला पोहचला होता. मानखुर्द परिसरातील धर्मवीर सामाजिक संस्था 2008 पासून दहीहंडी साजरी करते.
धर्मवीर सामाजिक संस्थेतर्फे मानखुर्दमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला
मुंबई- येथील मानखुर्द रेल्वे स्थानक पूर्व येथे आज धर्मवीर सामाजिक संस्थेतर्फे दहीहंडी उत्सव दरवर्षीप्रमाणे या वर्षीही साजरा करण्यात आला. यावर्षी दहीहंडीचा कार्यक्रम सांगली, कोल्हापूरातील महापुरामुळे रद्द करण्यात येणार होता. पण संस्थेने कार्यक्रमातूनच जास्तीत जास्त पूरग्रस्त निधी जमा करीत दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे ठरवले व आज दहीहंडी उत्सव साजरा केला.