मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील ब्रिज कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. काळजाचा थरकाप उडविणाऱ्या या फुटेजमध्ये हा ब्रिज कशा प्रकारे कोसळला हे दिसत आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी आहेत.
'CSMT' पादचारी पूल कोसळल्याची घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडिओ - सीएसमटी स्थानक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील ब्रिज कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. काळजाचा थरकाप उडविणाऱ्या या फुटेजमध्ये हा ब्रिज कशा प्रकारे कोसळला हे दिसत आहे.
सीसीटीव्ही फुटेज
'सीएसएमटी' स्थानकातील टाइम्स ऑफ इंडिया जवळील पूल गुरुवारी सायंकाळी कोसळला. यात ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईतील लोक कशाप्रकारे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.