मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मूळ हिंगोलीच्या मिहिका देशपांडे हिने मराठीचा अटकेपार झेंडा रोवला आहे. सीबीएसईच्या पंचकुला विभागातून ती पहिली आली असून देशातून तिसऱ्या रँकमध्ये तिने आपले नाव कोरले आहे. दहावीत तिने ५०० पैकी ४९७ गुण मिळवले आहेत. अशाप्रकारे बाहेरच्या राज्यातील रिझनमध्ये प्रथम येणारी यंदाच्या सीबीएसईतील मिहिका देशपांडे ही पहिलीच मराठी मुलगी ठरली आहे.
मूळ हिंगोलीतील पराग देशपांडे हे मराठी कुटुंब पुणे-मुंबईनंतर मागील सहा वर्षांपासून गुरगाव, हरियाणा येथे नोकरीसाठी स्थायिक झाले आहे. त्यांची मुलगी मिहिका देशपांडे हिने चौथीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या वांद्र्यातील माणिक विद्यामंदिर या शाळेतून पूर्ण केले.
मराठमोळ्या मिहिका देशपांडेने रोवला सीबीएसईत मराठीचा झेंडा; पंचकुला विभागातून ठरली टॉपर - Marathi topper
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मूळ हिंगोलीच्या मिहिका देशपांडे हिने मराठीचा अटकेपार झेंडा रोवला आहे.
आता ती गुरगाव येथील सेक्टर-५४ मध्ये असलेल्या सनसिटी स्कूल आणि या परिसरातून अव्वल ठरली आहे. ती हरियाणा राज्यातील टॉपरमध्ये आली आहे. सीबीएसईच्या पंचकुला या विभागीय मंडळात येणाऱ्या हरियाणा राज्यातील पहिल्या टॉपरमध्ये ती आल्याने आपल्याला खूप सार्थ अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया पराग देशपांडे यांनी दिली.
मिहिका देशपांडे म्हणाली, मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पुण्याहून चौथीत असताना आम्ही इकडे आलो होतो. मेहनत आणि आई-वडिलांचे आशीर्वाद मागे असल्याने मला हे यश मिळवता आले. मला अभियांत्रिकीच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यातच इंडस्ट्रीयल डिझाईन हाही माझा आवडीचा विषय असल्याने या क्षेत्राकडे वळायचे आहे. दहावीची ही सुरुवात झाली असली तरी पुढे जेईईसारख्या परीक्षांचीही मी तयारी करणार असल्याचे तिने सांगितले.
पराग देशपांडे यांनी आपण मराठी असतानाही आपल्या मुलीने अव्वल स्थान मिळवल्याने त्याचा आपल्याला खूप आनंद झाला असल्याचे सांगितले. मी अमेरिकन एक्सप्रेसमध्ये नोकरी करतो. मुलीने आपली संस्कृती जपली असून ती कधीही इथल्या आकर्षणात गुंतली नाही. अभ्यास आणि आपले लक्ष्य समोर ठेवून असते असेही देशपांडे यांनी आपल्या मुलीबद्दल सांगितले.