महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CBSE Exam for 10th and 12th : सीबीएसई बोर्डाची मुख्य परीक्षा सोमवारपासून - CBSE Exam for 10th and 12th

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. सोमवारपासून मुख्य परीक्षा सुरू होत आहे. CBSE बोर्डाच्या वेळापत्रकानुसार, 15 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या 10वीच्या परीक्षा 21 मार्चला आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा 5 एप्रिलला संपणार आहेत.

CBSE Exam for 10th and 12th
CBSE Exam for 10th and 12th

By

Published : Feb 19, 2023, 9:38 PM IST

नवी दिल्ली : सीबीएसईच्या परिक्षा सुरू झाल्या आहेत. यामध्ये (15 फेब्रुवारी)रोजी सीबीएसई 10वी बोर्डाची पहिली परीक्षा चित्रकलेची होती. दुसरीकडे, 12वीची 20 फेब्रुवारीला हिंदी बोर्डाच्या परीक्षेनंतर बारावीचे विद्यार्थी 24 फेब्रुवारीला इंग्रजी, 28 फेब्रुवारीला रसायनशास्त्र, 2 मार्चला भूगोल, 6 मार्चला भौतिकशास्त्र, 9 मार्चला विधिशास्त्र, 11 मार्चला गणित, 11 मार्चला जीवशास्त्र या विषयाची परीक्षा होणार आहे. १६ मार्चला जीवशास्त्र आणि १७ मार्चला अर्थशास्त्राची परीक्षा होणार आहे.

वेळापत्रक : सीबीएसईच्या वेळापत्रकानुसार बुधवार, 15 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या 10वीच्या परीक्षा 21 मार्चला संपणार आहेत. तसेच, 12वी बोर्डाच्या परीक्षा 5 एप्रिलला सुरू होणार आहेत. दहावीची पहिली परीक्षा चित्रकलेची होती. दहावीच्या मुख्य परीक्षा २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. 27 फेब्रुवारी रोजी सीबीएसई 10वी बोर्डासाठी इंग्रजीची परीक्षा होणार आहे. त्यानंतर ४ मार्च रोजी विज्ञानाची परीक्षा होईल. 11 मार्चला संस्कृत, 15 मार्चला सामाजिक विज्ञान, 17 मार्चला हिंदी आणि 21 मार्चला गणिताची परीक्षा होणार आहे.

12वीची परीक्षा : सीबीएसई 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा देशभरातील 7,250 परीक्षा केंद्रांवर घेतल्या जात आहेत. CBSE च्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून जगभरातील 26 देशांमध्ये सुरू झाल्या आहेत. या परीक्षांना 38 लाख 83 हजार 710 विद्यार्थी बसले आहेत. यापैकी 21,86,940 उमेदवार 10वी आणि 16,96,770 उमेदवार 12वीची परीक्षा देत आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारीला परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फारशी नव्हती. याचे, कारण म्हणजे तेव्हा दहावी आणि बारावीच्या मुख्य विषयांच्या परीक्षा सुरू झाल्या नव्हत्या.

एप्रिलपर्यंत परिक्षा चालणार : सीबीएसई बोर्डाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांच्या परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक तास आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीबीएसईच्या म्हणण्यानुसार, एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी सकाळी 10 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर प्रवेश निश्चित करायला हवे. सीबीएसई बोर्डाच्या या परीक्षा दुपारी 1.30 वाजता संपणार आहेत.

गणवेशातच परीक्षा केंद्रावर यावे लागणार : सीबीएसई बोर्डाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र तसेच त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शालेय गणवेशातच परीक्षा केंद्रावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रात इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि जीपीएससह मोबाइल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षेत अनुचित मार्ग आणि कॉपी करू नका, अशा स्पष्ट सूचना बोर्डाने दिल्या आहेत.

हेही वाचा :तोंडात सिगारेट, हातात कट्टा.. धीरेंद्र शास्त्री यांच्या धाकट्या भावाने लग्न समारंभात दलितांना धमकावले

ABOUT THE AUTHOR

...view details