मुंबई :सीबीआयच्या वतीने आज अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावेळी अनिल सिंग यांनी असा युक्तिवाद केला की सर्वोच्च न्यायालयात वेकेशन सुट्टी असल्यामुळे सर्वोच्च न्यायालय बंद असणार आहे. अनिल देशमुख (former Home Minister Anil Deshmukh) यांच्या जमिनीला स्थगिती द्यावी याकरिता अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. (Anil Deshmukh granted bail in CBI case) मात्र यावर अद्याप सुनावणी न झाल्याने उच्च न्यायालयाने दिलेल्या 10 दिवसाची स्थगितीची मुदत आणखी 3 जानेवारीपर्यंत वाढवून देण्यात यावी (appeal against bail in Supreme Court) अशी विनंती करण्यात आली आहे. (hearing on CBI application)
Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या जामीनावर दिलेली स्थगिती प्रकरणी उच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी - former Home Minister Anil Deshmukh
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former Home Minister Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर (Anil Deshmukh granted bail in CBI case) केला होता. या जामीना विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव (appeal against bail in Supreme Court) घेण्याकरिता सीबीआयला 10 दिवसाची मुदत देण्यात आली होती. ही मुदत उद्या 21 डिसेंबर रोजी संपणार असल्याने आज सीबीआयने उच्च न्यायालयात अर्ज (CBI application in High Court) करत मुदत 3 जानेवारीपर्यंत वाढवून देण्यात यावे अशी मागणी न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्याकडे केली आहे. या अर्जावर उद्या 21 डिसेंबर रोजी सुनावणी (hearing on CBI application) होणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा उद्या कारागृहातील मुक्काम संपणार की वाढणार, हे उद्या स्पष्ट होणार आहे. अनिल देशमुख 13 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. (Anil Deshmukh Bail Case)
म्हणून देशमुखांवर गुन्हा दाखल :अनिल देशमुख यांना सीबीआयने 100 कोटींच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना आरोग्याच्या कारणास्तव उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. दरम्यान अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. पण सीबीआयने अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण अखेर देशमुख यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी कथित वसुली गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल देशमुख यांचा यापूर्वी जामीन मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने फेटाळून लावला होता त्यानंतर अनिल देशमुख यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.