मुंबई -सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. शुक्रवारी आणि शनिवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुमारे १७ तास चौकशी करण्यात आली. आज रविवारी सलग तिसऱ्या दिवशीही रियाची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांच्या सुरक्षेखाली रिया चक्रवर्ती चौकशीला डीआरडीओ अतिथी गृहात हजर झाली आहे.
रिया चक्रवर्ती तिसऱ्या दिवशीही सीबीआयसमोर चौकशीला हजर - रिया चक्रवर्ती लेटेस्ट न्यूज
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह याचा 14 जूनला मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एडीआर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला नव्हता. याच दरम्यान सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी जोर धरू लागली असताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला.

सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय गेला आठवडाभर मुंबईत चौकशी करत आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची गेले दोन दिवस चौकशी करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी पुन्हा रिया सांताक्रूझ येथील डीआरडीओच्या अतिथी गृहात चौकशीसाठी 10.32 वाजता हजर झाली आहे. तिच्या आधी सॅम्युअल मिरांडाही चौकशी साठी हजर झाला आहे. सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग यांची सीबीआयने चौकशी केली आहे. या प्रकरणाला अमली पदार्थाची माहिती समोर आल्याने एक नवीन वळण मिळाले आहे.