महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sameer Wankhede CBI Inquiry : समीर वानखेडेंची दुसऱ्या दिवशीही सीबीआयकडून पाच तास चौकशी; म्हणाले, न्याय व्यवस्थेवर विश्वास.... - आर्यन खान खंडणी प्रकरण

आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची मागणी आणि भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता असे आरोप असलेल्या समीर वानखेडे यांची रविवारीसुद्धा सीबीआयने तब्बल पाच तास चौकशी केली. वानखेडे यांची शनिवारीही पाच तास चौकशी झाली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.

समीर वानखेडे
समीर वानखेडे

By

Published : May 21, 2023, 8:03 AM IST

Updated : May 21, 2023, 6:08 PM IST

मुंबई : आर्यन खानला कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणात अटक करणारे राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करुन सीबीआय तपास करत आहे. सीबीआयने वानखेडे यांच्यासह अन्य आरोपींच्या घर, कार्यालये, मालमत्तांवर छापेमारी केली होती. सीबीआय अधिकाऱ्यांनी शनिवारी तब्बल साडेपाच तास कसून चौकशी केली. रविवारीही पाच तास सीबीआयने वानखेडे यांची चौकशी केली आहे.

सत्यमेव जयते! माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे - समीर वानखेडे

समीन वानखेडेंची प्रतिक्रिया - आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी शनिवारी तब्बल साडेपाच तास कसून चौकशी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ते सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. रविवारी देखील समीर वानखेडे यांची सीबीआयने पाच तास केली. चौकशीनंतर बाहेर आल्यावर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे ते यावेळी म्हणाले.

शनिवारी झाली चौकशी : दरम्यान आर्यन खान खंडणी प्रकरणात सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या घरात सीबीआय पथकाने छापेमारी केली होती. छापेमारीवेळी समीर वानखेंडेंच्या मुंबईतील घरी १३ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. त्यानंतर वानखेडे यांना गुरुवारी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र वानखेडे चौकशीला हजर राहिले नाही. मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर शनिवारी सकाळी ते सीबीआयच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयात हजर झाले. सत्यमेव जयते असे बोलून ते सीबीआय कार्यालयात गेले होते.

जेवणासाठी दिला अर्धा तास : वानखेडे यांची सकाळच्या सत्रात साडेतीन तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास जेवणासाठी त्यांना ३० मिनिटे बाहेर सोडण्यात आले. दुपारी पुन्हा चौकशीला हजर राहिलेल्या वानखेडे यांची दोन तास चौकशी करण्यात आली. दुपारी साडेचार वाजता ते सीबीआय कार्यालयातून बाहेर पडले.

विचारण्यात आले हे प्रश्न : सीबीआयने वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरणाशी संबंधित वादग्रस्त घडामोडी, झालेले आरोप, एनसीबीचा अहवाल यावरुन प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, वानखेडे यांच्या चौकशीसाठी दिल्लीतून सीबीआयची एक टीम दाखल झाली आहे. वानखेडेंची प्रॉपर्टी, महागड्या गाड्या आणि परदेश वाऱ्यांवरील खर्च यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

सीसीटीव्ही छेडछाडसाठी उंदीर जबाबदार : आर्यन खानची चौकशी आणि अटके दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केली होती का, याचाही तपास समीर वानखेडेंच्या चौकशीत सीबीआय करत आहे. आर्यन खानला अटक झाल्यानंतर त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेजच उपलब्ध नाहीत. सीसीटीव्ही आणि डीव्हीआर करप्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सीसीटीव्हीची वायर उंदरानी कुरतडल्याचे कारण एनसीबी कार्यालयाकडून देण्यात आले.

काय आहे प्रकरण :आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात न गोवण्याच्या बदल्यात शाहरुख खानकडे २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप वानखेडे यांच्यासह अन्य आरोपींवर आहे. या रकमेच्या बदल्यात आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. वानखेडे यांच्या सांगण्यावरुन एनसीबीचा पंच किरण गोसावी याने २५ कोटींची खंडणी मागितली. वानखेडे यांनी किरण गोसावीला पैसे मागण्याची पूर्ण सूट दिली होती. त्यामुळेच गोसावी याने १८ कोटींमध्ये सौदा पक्का करत ५० लाख रुपये अॅडव्हान्सही घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Politics: साताऱ्यातून निवडणुकीला उभे राहिल्यास शरद पवारांनाही पाडू; शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांचे दिपक पवार यांना आव्हान
  2. Akola Riots : अकोला शहरात दंगल घडविण्यासाठी कारणीभूत दोघांना पकडले - पोलीस अधीक्षक घुगे
Last Updated : May 21, 2023, 6:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details