मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात सीबीआयचे पथक आज सलग दुसऱ्या दिवशी रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. कालही सीबीआयने रियाची 9 तास चौकशी केली.
सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयकडून रिया चक्रवर्तीची होणार चौकशी
सीबीआयचे पथक आज सलग दुसऱ्या दिवशी रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. सध्या सॅम्युएल मिरांडा चौकशीसाठी डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये उपस्थित आहे. सीबीआयची टीम आज रिया आणि सॅम्युअल मिरांडाची समोरासमोर बसवून चौकशी करू शकते.
सध्या सॅम्युएल मिरांडा चौकशीसाठी डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये उपस्थित आहे. सीबीआयची टीम आज रिया आणि सॅम्युअल मिरांडाची समोरासमोर बसवून चौकशी करू शकते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणामध्ये आता अमली पदार्थ विरोधी विभागाची सुद्धा एन्ट्री झाली आहे. याअगोदर सीबीआयने रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, संदीप सिंह यांचीही चौकशी केली आहे.
सुशांतसिंह राजपूत ने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आर्थिक बाजूंचा तपास ईडी तर, अमली पदार्थांचे कनेक्शन आहे का याचा तपास नार्कोटिक्स ब्युरो करत आहे.